शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tula Shikvin Changlach Dhada : एकीकडे चारुलताचे लग्न, दुसरीकडे अक्षरा संकटात, अधिपती वाचवणार का?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 14, 2024 | 1:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial update new promo that Akshara will be in crisis Will the adhipati protect his wife

Tula Shikvin Changlach Dhada मालिकेत अक्षरावर येणार संकट, नवीन प्रोमो व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी चारुलताची एन्ट्री झाली आहे. चारुलताच्या एन्ट्रीनंतर मालिकेला एक नवीन वळण आलं आहे. अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. चारुहास-अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. एका अपघातात अधिपतीची खरी आई चारुलताचे निधन झाले आहे, असे कुटुंबातील सर्व जण समजतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात भुवनेश्वरी येते, जी चारुलतासारखी दिसते. आता चारुहासने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर चारुलता अक्षराला सापडते. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Updates)

चारुहास आणि चारुलता यांच्यातील नाते पूर्वीसारखे व्हावे यासाठी अक्षरा त्यांचे पुन्हा एकदा लग्नदेखील करण्याची तयारी करीत असल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी अक्षराला चारुलताच भुवनेश्वरी असल्याचे वाटले. त्यानंतर तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर तिला वेडी ठरविण्यात आले. बुधवारच्या भागात अक्षरा अधिपतीला घेऊन पोलिस स्थानकात बजरंगला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी तिने बजरंगला रस्त्यावर भुवनेश्वरीबरोबर बघितल्याचे अधिपती व पोलिसांना सांगते. मात्र पोलिस तिला बजरंग जेलमध्येच असल्याचे सांगतात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Appi Amchi Collector मालिकेत नवा ट्विस्ट, अमोलने अप्पी-अर्जुनला सांगितलं आजार लपवण्यामागचे कारण, पुढे काय होणार?

बुधवारच्या भागात अक्षराला वेड लागल्याचे समजत हॉस्पिटलमधून काही नर्स तिला घेऊन जायला येतात. अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात अक्षरावर संकट आल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षरा हॉस्पिटलमध्ये असताना तिला अधिपती फोन करतात. तेव्हा बजरंग तिच्या खोलीमध्ये येतो. यादरम्यान, अक्षरा त्याच्यापासून वाचण्यासाठी आरडाओरडा करत असते आणि नर्सच्या फोनवर अधिपती तिचे ओरडणे ऐकतो.

आणखी वाचा – सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीवर जीवघेणा हल्ला, हात फ्रॅक्चर, म्हणाली, “खूप वेदना…”

अक्षराचे किंचाळणे ऐकून अधिपतीला काहीतरी गडबड असल्याचे जाणवते आणि तो धावत धावत हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. त्यामुळे आता संकटात पडलेल्या अक्षराला अधिपती वाचवू शकणार का? बजरंगपासून अक्षरा स्वत:चा बचाव करणार का? अक्षरा संकटात असताना चारुलता तिचा डाव साधणार का? हे मालिकेच्या आगामी भगातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.   

Tags: Marathi Serial Newsserial newsTula Shikvin Changalach Dhada Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Ranveer Singh Came To Convince Mukesh Khanna

'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी रणवीर सिंगने घेतली थेट मुकेश खन्ना यांची भेट, अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाले, "त्याने २ तास प्रयत्न केला पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.