झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. भुवनेश्वरीने अधिपती आणि अक्षराला १० दिवसांचं आव्हान दिलं. घराबाहेर राहून दोघांना सिद्ध करून दाखवायचे होते की, ते आपल्या संसाराची जबाबदारी घेण्यास किती आहेत. अधिपती-अक्षराच्या या कसोटीत खूप आव्हान ही येतात. जिथे कुस्तीमध्ये जिंकलेले पैसे दुर्गेश्वरी-चंचला चोरतात. भुवनेश्वरी अक्षरा अधिपती ज्या काकांच्या घरात राहतात त्या काकांना दोघांकडून घराचं १० हजार भाडं वसूल करायला लावते. पण सगळी आव्हान पूर्ण करुन ते दोघे घरी येतात. घरात सगळे त्यांचं गोड कौतुक, स्वागत करतात.
संसारासाठी अधिपतीने कुस्तीही खेळली. याशिवाय त्यांनी शेतीही केली. संसारासाठी अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांनी भुवनेश्वरीने त्यांना दिलेल्या परीक्षेत ते आता यशस्वी झाले आहेत. दोघांनी त्यांचे हे दहा दिवस पूर्ण केले असून ते आता पुन्हा त्यांच्या घरी गेले आहेत आणि घरी जाताच चारुहास यांनी अधिपती-अक्षराचे स्वागतही केलं आहे. आता या दोघांतील प्रेम हे खूपच खुलून येत आहे. अधिपती अक्षराच्या प्रेमात वेडा झाल्याचे समजून भुवनेश्वरी त्याच्याकडून फॅक्टरीचा सगळा कारभार तिच्या हातात घेणार आहे. याबद्दलचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – Video : अनंत अंबानीने रामदेव बाबांनाही नाचवलं, भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात का?
झी मराठीच्या सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये अधिपती अक्षराला तुम्ही आमच्या आयुष्यात आलात अन् मंदिराचा स्वर्गच झाला” असा म्हणतो. त्याचे हे बोलणं ऐकून अक्षराही लाजते. त्यानंतर भुवनेश्वरी त्या दोघांमधील हे प्रेम पाहून अधिपतीचे आता कामात लक्ष लागेल असं आम्हाला आता वाटत नाही. त्यामुळे पहिल्यासारखा फॅक्टरीचा सगळा कारभार आता आम्ही आमच्या हातात घेणार” असं म्हणते.
त्यामुळे आता अधिपती यावर काय निर्णय घेणार? भुवनेश्वरीने त्याच्या नकळत घेतलेला हा निर्णय त्याला सहन होणार का? की अक्षरा तिच्या हुशारीने फॅक्टरीचा सगळा कारभार अधिपतीकडेच राहावा म्हणून प्रयत्न करणार? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.