शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चारुलता व चारुहासचे लग्न थांबवण्यासाठी अक्षराने लढवली अनोखी शक्कल, वेश बदलून रुग्णालयातून पळाली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 26, 2024 | 7:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada marathi serial update Akshara change her clothes and escape from the hospital to stop Charulata and Charuhas marriage

चारुलता व चारुहासचे लग्न थांबवण्यासाठी चारुलताचा नवीन प्लॅन, वेश बदलून हॉस्पिटलमधून पळणार

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या चारुहास आणि चारुलता (भुवनेश्वरी) यांच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात अक्षराला चारुलता भुवनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते. पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्व तिला वेडी ठरवतात. यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करते. चारुलता भुवनेश्वरी असल्याबद्दल कुणालाच काहीही कल्पना नाही आणि तिच्या याच जाळ्यात सूर्यवंशी कुटुंबीय अडकले आहेत. एकीकडे अक्षरा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे, तर दुसरीकडे भुवनेश्वरी तिची चाल खेळणार आहे. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Updates)

सध्या अक्षराची रवानगी रुग्णालयात करण्यात आलेली आहे. इथून बाहेर पडण्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करत असते. पण, काही केल्या अक्षराला ते शक्य होत नाही. कारण, भुवनेश्वरीने तिला अडकवून चारुहासशी लग्न करण्याचा डाव आखलेला असतो. तिला त्रास देण्यासाठी रुग्णालयात बजरंग येतो. पण, नर्स, डॉक्टर या सगळ्यांना भुवनेश्वरीने आधीच पैसे दिलेले असतात. अधिपतीला हे सगळेजण इथे कोणीच आलेलं नाही असं सांगतात. अशातच आता अक्षरा भुवनेश्वरीचा लग्न लावण्याचा डाव उधळून लावणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ‘अनुपमा’च्या सेटवर मृत्यू झालेल्या त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदतीचा हात, १० लाख रुपयांची मदत, दुर्देवी घटना घडली अन्…

झी मराठीच्या सोशल मीडियाद्वारे या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे आणि या नवीन प्रोमोमध्ये अक्षरा वेश बदलून हॉस्पिटलमधून पळ काढणार आहे. कालच्या भागात चंचलाकडून अक्षराला भुवनेश्वरी तिच्या गैरहजेरीत लग्न लावणार असल्याचे कळलं आहे. त्यामुळे आता अक्षरा हे लग्न थांबवण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे हे लग्न थांबवण्यासाठी ती हॉस्पिटलमधून पळणार आहे. या प्रोमोमध्ये अक्षराला तपासण्यासाठी नर्स येते. या नर्सला बेशुद्ध करुन ती तीचे कपडे घालते आणि नर्सच्या वेशात पळ काढते.

आणखी वाचा – “मी दारु पिऊन आलो असं आईला वाटलं अन्…”, सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “रात्री घरी आलो तेव्हा…”

एकीकडे अक्षरा हॉस्पिटलमधून पळ काढते. तर दुसरीकडे चारुलता (भुवनेश्वरी) व तिच्या लग्नाचा घाट घालत आहे. यावेळी ती आता मी सगळ्या विधी पूर्ण करणार असल्याचे सासूला सांगते. त्यामुळे आता भुवनेश्वरी अक्षराच्या गैरहजेरीत स्वत:चं लग्न लावणार का? की अक्षरा हॉस्पिटलमधून येत हे लग्न थांबवणार? किंवा भुवनेश्वरी सुनेला खोटं सिद्ध करण्यात पुन्हा एकदा यशस्वी होणार? हे पाहणं आगामी भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.   

Tags: Marathi Serial NewsTula Shikvin Changalach Dhada Marathi SerialTula Shikvin Changalach Dhada Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Next Post
27 November 2024 daily horoscope Due to Ayushman Yoga, Aries, Virgo and Gemini sign people progress in job and business on Wednesday

27 November Horoscope : आयुष्मान योगामुळे बुधवारचा दिवशी मेष, कन्या व मिथुन राशीच्या लोकांची नोकरी आणि व्यवसायात प्रगती, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.