कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओ येथे त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्या ही टोकाची भूमिका घेण्यामागचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस याचा शोध घेत आहेत. दरम्यान उरण-खालापूरचे आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या मृत्यूमागे आर्थिक कारण असल्याचा संशय़ व्यक्त करत भाष्य केला आहे. (Nitin Desai Suicide)
आमदार महेश बालदी हे नितीन देसाई यांच्या निधनानंतर बोलताना असे म्हणाले की, “एक-दीड महिन्यापूर्वी जेव्हा आमची भेट झाली होती तेव्हा स्टुडिओमुळे ते आर्थिक विवंचनेत होते, असं त्यांनी मला सांगितलं होतं. आज सकाळी चार वाजता त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

आमचे प्रमुख कार्यकर्ते सुधीर ठोंबरे यांनी मला सकाळी साडेआठ वाजता याची फोनवरुन माहिती दिली. नितीन देसाई यांनी कर्जतमधील स्थानिक मुलांना आपल्या स्टुडिओत काम दिलं होतं. त्यांच्याकडून आम्हाला हे कळलं की ते आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं प्राथमिकदृष्ट्या दुसरं कारण सध्या दिसत नाही”(Mahesh Baldi and nitin desai)
पाहा नितीन देसाई यांच्या निधनाचे सत्य महेश बालदी यांनी सांगितलं (Mahesh Baldi and nitin desai)
एक दीड वर्षांपासून त्यांचा कुठला सिनेमा चांगला चाललेला नाही. ते काही टीव्ही सिरियल्सवरही काम करत होते. पण त्यातून त्यांची आर्थिक गाडी रुळावर येत नसल्याची स्थिती होती. त्यामुळं आजचा हा दुःखद दिवस आपल्याला दिसला आहे, असंही बालदी यांनी पुढे म्हटलं आहे. यापुढे बोलताना ते म्हणाले की, “रायगड किल्ला चांगला दिसला पाहिजे यासाठी ते खूपच प्रयत्नशील होते.”
पूर्वी मुलुंडला राहणारे नितिन चंद्रकांत देसाई कालांतराने पवई येथे राहायला येथे आले होते.नितीन देसाई यांचं पार्थिव मुलुंड येथील इस्पितळात ठेवण्यात आले असून उद्या त्यांचे जावई व मुलगी विदेशातून आल्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.