शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासरे तितीक्षा तावडेची मालिका बघतात पण सासूबाई नाही कारण…; अभिनेत्री म्हणाली, “क्वचितच कधीतरी…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 21, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Titeeksha Tawde told the reason why her mother-in-law is not watching her serial know more details

सासरे तितीक्षा तावडेची मालिका बघतात पण सासूबाई नाही कारण...; अभिनेत्री म्हणाली, "क्वचितच कधीतरी..."

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या चांगलेच गाजत आहे आणि याच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. तितीक्षाने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं आहे. याचसह मोठ्या पडद्यावरही सक्षम भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनय क्षेत्रासह तितीक्षाही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी तितीक्षा काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. ६ फेब्रुवारी रोजी तितीक्षा व सिद्धार्थ यांचा अगदी शाही थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. तितीक्षाची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका अनेकजण आवडीने पाहत असले तरी तिच्या सासू मात्र ही मालिका पाहत नसल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे.

आणखी वाचा – ‘शिवा’ने खऱ्या आयुष्यात लग्नानंतर कधीच वटपौर्णिमा साजरी केली नाही कारण…; स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “एक उपवास केल्यामुळे…”

तितीक्षा तावडेने नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी तितीक्षाला तिच्या सासूबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. “तुझ्या मालिकेवर सासूची काय  प्रतिक्रिया असते?” असा प्रश्न विचारताच तितीक्षाने सासू मालिका बघत नसल्याचे सांगितले. यावेळी तितीक्षा असं म्हणाली की, “आमची मालिका रात्री साडे दहा वाजता प्रसारित होते. आई शिक्षिका असल्याने त्या रात्री उशिरा साडे दहानंतर फारशा जाग्या राहत नाहीत. कारण त्या सकाळी साडेचार वाजता उठतात. त्यामुळे त्या फार मालिका बघत नाहीत. क्वचितच कधीतरी त्या मालिका बघतात”.

आणखी वाचा – ‘शिवा’ने खऱ्या आयुष्यात लग्नानंतर कधीच वटपौर्णिमा साजरी केली नाही कारण…; स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “एक उपवास केल्यामुळे…”

यापुढे तितीक्षा तिची सासू मालिका बघत नसली तरी सासरे मात्र मालिका बघतात असं म्हटली आहे. “आई रोज मालिका बघत नसल्या तरी बाबा माझी मालिका रोज पाहतात. ते साडे दहानंतर जागे राहतात आणि ते मालिकेच्या कथानकाबद्दल अगदी अपडेटेड असतात. त्यांना मालिकेत काय चालू आहे काय नाही हे माहिती असतं. त्याचबरोबर सिद्धार्थचे आजोबाही माझी मालिका बघतात. ते फार मनापासून माझी मालिका बघतात आणि त्यांना माझे प्रत्येक हावभाव माहीत असतात. प्रत्येक सीनलं ते मला फोन करून त्यांची प्रतिक्रिया देतात”.

Tags: marathi actressmarathi entertainment newstiteeksha tawde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Rupali's first attempt to kill Netra's baby fails

नेत्राच्या बाळाला मारण्याचा रुपालीचा पहिला प्रयत्न अयशस्वी, काय असेल विरोचकाची नवीन खेळी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.