बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

संपूर्ण बॉलिवूड लोटलं पण अंबानींच्या पार्टीमधून गायब होता करण जोहर, आता स्वतःच दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “जाता आलं नाही कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 8, 2024 | 12:09 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding

संपूर्ण बॉलिवूड लोटलं पण अंबानींच्या पार्टीमधून गायब होता करण जोहर, आता स्वतःच दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, "जाता आलं नाही कारण..."

जगातील सुप्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानी व सून राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. सलग तीन दिवस सुरु असलेल्या या दिमाखदार सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु होती. देश-विदेशातील अनेक दिग्गज मंडळींनी या सोहळ्यासाठी खास सहभाग घेतला. या खास प्रसंगी संपूर्ण बॉलीवूड विश्वातील कलाकार मंडळी जामनगरमध्ये पोहोचले होते. दरम्यान चित्रपट निर्माता करण जोहर या सोहळ्यापासून गायब असल्याचं चित्र दिसलं. करण जोहर पार्टीला का गेला नाही?, हा प्रश्न साऱ्या नेटकऱ्यांना पडला होता. (Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding)

आता करण जोहर पार्टीला का गेला नाही यामागचे कारण समोर आले आहे. करण जोहरने अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळयाला का हजेरी लावली नाही. ‘इंडिया टुडे’ने याबाबची माहिती दिली आहे. अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनला उपस्थित राहण्यासाठी चित्रपट निर्माता करण जोहरने पूर्ण तयारी केली असल्याचे एका सूत्राकडून समोर आले आहे. मात्र त्यानंतर अचानक त्याची प्रकृती खालावली आणि त्याला घरीच राहावे लागले. करणला व्हायरल ताप होता आणि त्याच्या घशातही खूप दुखत होते, अशी माहितीही सूत्रांकडून समोर आली आहे.

आणखी वाचा – राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीने केलं दुसरं लग्न, त्याची बायको नेमकं काय करते?, अभिनयक्षेत्राशी खास कनेक्शन अन्…

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

प्रकृती ठीक नसल्याने अखेरच्या क्षणी त्याला आपला प्लॅन रद्द करावा लागला. करणही त्याचा जवळचा मित्र मनीष मल्होत्राबरोबर संगीत सेरेमनीमध्ये परफॉर्म करणार होता. रिपोर्ट्सनुसार, करणने फोनवरच राधिका व अनंतचे अभिनंदन केले होते. करणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर राधिका व अनंतचा एक सुंदर व्हिडीओही पोस्ट केला होता. हा व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटलं की, “मला अनंत व राधिकाचे मनापासून अभिनंदन करायचे आहे. या उत्सवात केवळ कौटुंबिक बंधच दिसत नव्हते तर भारताची सुंदर संस्कृतीही पाहायला मिळाली”, असं तो म्हणाला.

आणखी वाचा – बहिणीच्या निधनानंतर काही तासांतच अभिनेत्री डॉली सोहीने सोडला जीव, तिलाही झाला होता गंभीर आजार, कुटुंबाला दु:ख सहन होईना

करण जोहर हा मनीष मल्होत्रासह या सोहळ्यामध्ये परफॉर्म करणार होता. मात्र अचानक येण्याचे रद्द झाल्याने मनीषने बॉलीवूडच्या अभिनेत्रींसह एकट्याने परफॉर्म केले. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सारा अली खान व खुशी कपूर यांच्यासह ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘बोले चुडिया’ या गाण्यावर तो थिरकताना दिसला. त्यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

Tags: Anant Ambani and Radhika MerchantAnant Ambani-Radhika Merchant Pre Weddingentertainmentkaran joharkaran johar on anant ambani pre wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Next Post
Dolly sohi Amandeep Death

कर्करोगामुळे जगणंही झालं होतं कठीण, प्रार्थना करत राहिली अन्…; डॉली सोहीची मन हेलावणारी शेवटची पोस्ट व्हायरल, म्हणालेली, "चमत्कार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.