बुधवार, ऑगस्ट 5, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रमेश चौधरी यांच्या शैलीतून उलगडणार ‘सालबर्डी’चा थरार, दिग्दर्शनातून येणार दडलेलं रहस्य समोर, १७ एप्रिलला जवळच्या सिनेमागृहांत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 14, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Salbardi Marathi Movie News

रमेश चौधरी यांच्या शैलीतून उलगडणार ‘सालबर्डी’चा थरार, दिग्दर्शनातून येणार दडलेलं रहस्य समोर, १७ एप्रिलला जवळच्या सिनेमागृहांत

Salbardi Marathi Movie News : चित्रपट ही केवळ कथा नसते ती एक भावनांची, दृश्यांची आणि विचारांची गुंफण असते. या गुंफणीत प्रत्येक धागा योग्य ठिकाणी बांधण्याचं कौशल्य दिग्दर्शकाकडे असतं. म्हणूनच चित्रपटाच्या यशाचं खरं सूत्र दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनात आणि मांडणीत दडलेलं असतं. सक्षम निर्मितीमूल्यांची जोड मिळाली, की ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनात घर करुन जाते. अशाच वेगळ्या वाटेवर चालणारे, आशयघन आणि प्रभावी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी आता प्रेक्षकांसाठी एक नवा, थरारक अनुभव घेऊन येत आहेत ‘सालबर्डी’. सामाजिक आणि वास्तववादी विषयांवर ठसा उमटवणाऱ्या चौधरी यांनी यावेळी रहस्य आणि थरार यांची सांगड घालत एक उत्कंठावर्धक कथा पडद्यावर साकारली आहे.

निर्माते अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांची भक्कम साथ लाभलेला हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारला असून, येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गुल्हर, बाबो, पाणीपुरी यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर ‘सालबर्डी’मधून रमेश चौधरी प्रेक्षकांना एका गूढ आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाणार आहेत. याबाबत ते सांगतात, “मला नेहमीच वेगळ्या कथा सांगायला आवडतात. ‘सालबर्डी’च्या माध्यमातून प्रेक्षकांना अशा एका रहस्यमय प्रवासावर नेण्याचा प्रयत्न आहे, जिथे प्रत्येक क्षणी नवं काहीतरी उलगडत जातं. हा केवळ मनोरंजनासाठीचा चित्रपट नाही, तर विचार करायला भाग पाडणारा आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा अनुभव आहे.”

आणखी वाचा – बॉयफ्रेंडकडून विश्वासघात, लग्न न करण्याचा निर्णय अन्…; ४० व्या वर्षी सुप्रसिद्ध कोरियोग्राफर राहतेय एकटी, मुलं नको म्हणून…

चित्रपटाची कथा गूढ घटनांच्या साखळीतून उलगडत जाते. प्रत्येक प्रसंगात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणं आणि अंगावर काटा आणणारे क्षण प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवतात. ‘सालबर्डी’ हा केवळ थरारपट नाही, तर मनात प्रश्न निर्माण करणारा, अस्वस्थ करणारा आणि दीर्घकाळ लक्षात राहणारा अनुभव ठरणार आहे. दुर्गम महाराष्ट्रातील ‘सालबर्डी’ गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा भय आणि रहस्य यांचा थरारक संगम साकारते. या चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

आणखी वाचा – मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न, लूकने वेधलं लक्ष, कोण आहे होणारा नवरा?

रमेश चौधरी यांच्या दिग्दर्शनातील ‘सालबर्डी’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक वेगळा आणि महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच निर्माण झालेली उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. १७ एप्रिलला महाराष्ट्रभरात ‘सालबर्डी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tags: marathi moviesalbardi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar ibrahim emotional
Entertainment

कॅन्सरच्या उपचारादरम्यान भावुक झाली अभिनेत्री, हॉस्पिटलमध्येच रडू लागली, म्हणाली, “माझं शरीर…”

ऑगस्ट 4, 2026 | 10:03 am
Rashmika Mandanna Injury
Entertainment

शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत, आठवडाभर विश्रांतीची गरज, सेट कोसळला आणि…

ऑगस्ट 1, 2026 | 11:01 am
Arbaj Shaikh Father Passes Away
Entertainment

‘सैराट’ फेम अभिनेत्याला पितृशोक; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, रुग्णालयात उपचारादरम्यान…

जुलै 31, 2026 | 11:24 am
Patri Sarkar 1942
Entertainment

इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर, क्रांतीची गाथा सांगणाऱ्या ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

जुलै 31, 2026 | 11:22 am
Next Post
Digambar Naik Controversy

'दशावतार' चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, " मालवणी माणूस नको…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.