Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरु होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे आणि या घरातील सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. सूरजने बिग बॉस मराठीच्या घरात एण्ट्री केल्यानंतर सुरुवातीला त्याच्यावर खूप टीका करण्यात आली होती. पण अवघ्या काही दिवसांतच सूरजने टीका कराणाऱ्यांचीही मनं जिंकली. सुरुवातील त्याला बिग बॉसचा गेम समजलाच नव्हता. पण सगळ्या स्पर्धकांनी त्याला यासाठी मदत केली. तसंच ‘बिग बॉस’ व या शोचा होस्ट रितेश देशमुख यानंदेखील वेळोवेळी त्याचा आत्मविश्वास वाढवला. त्यानंतर या घरात त्याने आपल्या वागणुकीने सर्वांची मनं जिंकली. अगदी साध्या घरात जन्माला आलेल्या सूरजच्या आयुष्यात अनेक दु:ख आली पण त्याने या सर्वांवर मात करत इथपर्यंतचा प्रवास केला आहे. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)
आपलं काम, आपलं घर, आपली माणसं आणि आपले राहणीमान याबद्दल त्याला कधीही कमीपण वाटला नाही. सेलिब्रिटींच्या गर्दीत आपण वेगळे दिसू किंवा आपल्याला लोक काय म्हणतील? याचा कुठलाही विचार न करता अगदी मोकळ्या मनाने सूरज या घरात वावरत आहे. कमी वयात सूरजच्या डोक्यावरील आई-वडिलांचं छत्र हरवलं. आजी-आजोबाही गेले. त्यामुळे एकटा पडलेला सूरज एकाकीपणाचे दु:ख जाणतो. म्हणूनच त्याने काही दिवसांपूर्वी अनाथ मुलीबरोबर लग्न करणार असल्याचे म्हटलं होतं. अशातच आता सूरजने पुन्हा एकदा त्याच्या लग्नाचा विषय काढला आहे. घन:श्यामबरोबरच्या संवादात सूरजने ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर लग्न करणार असल्याचे म्हटलं आहे.
आणखी वाचा – जय दुधाणेने घेतली नवी कोरी अलिशान कार, वडिलांना मात्र विसरला नाही अभिनेता, फोटो पाहून कौतुकाचा वर्षाव
सूरज व घन:श्याम यांच्या संवादात घन:श्याम त्याला असं म्हणतो की, “मी माझ्या लग्नात सर्वांना बोलवणार. तुला पण तुझं सगळं शूटिंग वगैरे सोडून यावं लागेल”. तेवढ्यात सूरजही त्याला असं म्हणतो की, “हो! तुझ्या लग्नात मी एक महिना आधीच येणार. खूप मज्जा करायची, तुझ्यासाठी काहीही करुन मी येणार” . त्यानंतर सूरज घन:श्यामला असं म्हणतो की, “तुझ्या लग्नात तू खूप नटणार ना? तू नवरदेव असणार त्यामुळे तुझा खूप मेकअप करणार”. तेवढ्यात घन:श्याम त्याला असं म्हणतो की, “त्याआधी तुझं लग्न करावं लागेल ना?” यावर सुरज त्याला असं उत्तर देतो की, “आता गेल्यावर लगेच लग्न करणार. इथून गेल्यावर मला लगेच लग्न करायचं आहे”.
यावर घन:श्यामही त्याला असं विचारतो की “तुझ्या लग्नात मी किती दिवस आधी येऊ”. यावर सुरज त्याला असं म्हणतो की, “ये की एक महिना आधी. इथून गेल्यावर मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे”. यावर घन:श्याम असं म्हणतो की, “तू आम्हाला आनंदाची बातमी देऊ शकत नाही. उलट आम्ही तुला देणार आनंदाची बातमी, आम्ही वहिनी बघणार”. पुढे सूरज त्याला असं म्हणतो की, “आता मुली किंगची वाट बघत असतील”. पुढे घन:श्याम त्याला असं म्हणतो की, “किंगची वाट कुणीही बघू देत. पण आम्हाला वहिनी कशी पाहिजे हे आम्ही बघणार. तुला बायको कशी पाहिजे हे तू नाही ठरवायचं ते आम्ही ठरवणार”.