शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाप्पा शब्द चुकीचा उच्चारणाऱ्यांवर भडकली जुई गडकरी, राग व्यक्त करत म्हणाली, “बप्पा नसतं ते…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 6, 2024 | 1:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharla Tar Mag serial fame actress Jui Gadkari shared a social media post about the wrong pronunciation of Ganapati Bappa.

गणपती बाप्पाच्या चुकीच्या उच्चाराबद्दल जुई गडकरीची पोस्ट, चूक दाखवणारी पोस्ट केली शेअर

चौसष्ट कला आणि चौदा विद्यांमध्ये पारंगत असलेल्या श्री गणरायांचे उद्या आगमन होते आहे. त्यांच्या आगमनामुळे घरोघरी, गल्लोगल्ली मांगल्य आणि चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण पाहायला आहे. असा हा आनंददायी गणेशोत्सव संपूर्ण भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात तर अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. बाप्पाच्या येण्याने संपूर्ण मुंबईनगरी आनंदीत झाली आहे. मुंबई, पुणे, कोकणात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत केले जाते. घरोघरी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. अवघ्या काही तासांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होईल, त्यापूर्वी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री जुई गडकरीने सर्वांना एक सल्ला दिला आहे.

अभिनेत्री जुई गडकरी मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला  येत आहे. सायली या भूमिकेतून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. सायली तिच्या वैयक्तिक आयुष्यासह कामाविषयीच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत सल्ला दिला आहे. 

आणखी वाचा – Bigg Boss Marathi संपताच सूरज चव्हाण करणार लग्न, होणारी बायको कोण असणार?, म्हणाला, “आनंदाची बातमी देणार आणि…”

मराठीमध्ये अनेकदा काही जण गणपती बाप्पांचा उल्लेख ‘बाप्पा’ असा न करता ‘बप्पा’ असा करतात. याबद्दल जुईने पोस्ट शेअर केली आणि लाल रंगाचा इमोजी म्हणजेच प्रचंड रागाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जुईने लिहिले आहे की, ‘…आणि कृपया ते ‘बाप्पा’ असतं ‘बप्पा’ नाही’. गणपती बाप्पाच्या चुकीच्या उच्चाराबद्दल अभिनेत्रीने राग व्यक्त केला असून सोशल मीडियावर अशाप्रकारे चुकीचा उल्लेख करणाऱ्यांना अभिनेत्रीने पोस्टद्वारे चांगलीच चपराक लावली आहे. तसंच जुईने वापरलेला रागाचा इमोजीच तिच्या यामागच्या भावना व्यक्त करत आहे.

आणखी वाचा – जय दुधाणेने घेतली नवी कोरी अलिशान कार, वडिलांना मात्र विसरला नाही अभिनेता, फोटो पाहून कौतुकाचा वर्षाव

सार्वजनिक आयुष्यात उद्या सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. याशिवाय मालिका विश्वातही गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे  आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेतही यंदा बाप्पाच्या आगमनावेळी एक मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सायलीच्या कानावर नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली. कानाचा पडदा फाटल्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर अभिनेत्री पुन्हा एकदा शूटिंगसाठी सज्ज झाली. याबद्दल तिने ओशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली होती.

Tags: jui gadkariJui Gadkari Ganapati Bappa Pronunciation Postmarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Bhushan Pradhan New Home

आई-बाबांसाठी भूषण प्रधानने पुण्यात खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशासाठी एकत्र आलं कुटुंब, पाहा Inside Photo

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.