गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी माझं आडनाव कधीच बदलणार नाही”, लग्नाला १० वर्ष होऊनही मोनिका दबडे लावते माहेरचंच नाव, म्हणाली, “नवऱ्याच्या घरी जाऊन…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 10, 2025 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Monika Dabade Surname

"मी माझं आडनाव कधीच बदलणार नाही", लग्नाला १० वर्ष होऊनही मोनिका दबडे लावते माहेरचंच नाव, म्हणाली, "नवऱ्याच्या घरी जाऊन…"

Monika Dabade Surname : लग्नानंतर नाव आणि आडनाव बदलणे आता खूप प्रमाणात कमी झालं आहे. खरं तर आजकाल दोन आडनाव लावतात. ही नवीन प्रथा सुरु झाली आहे. पण तरीही अनेक मुली लग्नानंतर आपलं माहेरचं आडनांव लावणंच पसंत करतात. आपल्या आई-वडिलांची आठवण म्हणून त्यांना आपल्या माहेरचे आडनांव लागायचे असते. अर्थात बरेचदा आजकाल मुलंही मुलींच्या या म्हणण्याला पाठिंबा देतात. आडनांव न बदलण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कलाकार. अनेक कलाकार मंडळी आहेत जी लग्नानंतर त्यांच्या माहेरचंच आडनांव लागतात, आणि अर्थात असे करण्यामागे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आडनांव न बदलण्यावरुन भाष्य केलं आहे.

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे. मोनिका लग्नाच्या १० वर्षांनीही तिच्या वडिलांकडचंच नाव लावते. मोनिकाच सासरचं आडनांव कुलकर्णी असं आहे. आडनांव न बदलण्याबाबत मोनिकाने ‘इट्स मज्जा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. हा इंटरव्ह्यू जेव्हा जाईल तेव्हा या इंटरव्ह्यू खालीदेखील पहिली कमेंट हीच असेल की आजकालच्या मुलींना जुन्या पद्धती स्वीकारायच्या नाही आहेत. यावर पहिलं वाक्य माझं असं असेल की, माझ्या बाबांचं आडनावं आहे दबडे. आणि मी त्यांचं आडनांवच लावणार कारण त्यांनी मला ही दिलेली ओळख आहे. चिन्मय माझा नवरा आहे ही माझी वेगळी ओळख आहे. पण माझ्या व्यावसायिक कारकिर्दीत मी जी काही उभी झाले आहे ती ओळख मला माझ्या वडिलांपासून मिळाली आहे”.

आणखी वाचा – पारंपरिकला मॉडर्न टच, राजेशाही थाट अन्…; प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्यातील रॉयल लूकची चर्चा, डिझाइनर साडीत खुललं सौंदर्य

पुढे तिने म्हटलं, “माझ्या विचारातून मी तयार झाले आहे. ती ओळख मी सोडू शकत नाही आणि त्यामुळे मी माझ्या वडिलांचंच नाव लावणार. माझ्या वडिलांनी मला मोठं केलं, त्यांनी मला घडवलं, त्यांनी माझं शिक्षण केलं आणि आता मी नवऱ्याच्या घरी जाऊन त्याचं नाव लावणं मला योग्य वाटत नाही. त्याच्यासाठी माझी मुलगी आहे. तिला चिन्मयचंच आडनांव लागणार आहे. आम्ही एकत्रच राहतो, आम्ही वेगळे झालेले नाही आहोत. माझ्या वडिलांकडून मला मिळालेली ओळख मला माझ्या शेवट्पर्यंत वापरायची आहे. हे माझं प्रांजळ मत आहे”.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पहिल्यांदाच कोकणात घेतोय भातशेतीचा आनंद, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “चिखलात काम करुन…”

शेवटी मोनिका म्हणाली, “माझ्या वडिलांनी मला जे दिलं आहे ते मी विसरु शकत नाही. मी आजही माझ्या कोणत्याच कागदपत्रावर माझं नाव बदललेलं नाही आणि मी ते करणार पण नाही आहे. आणि याबाबत चिन्मयचाही विरोध नव्हता”.

Tags: marathi actressmonika dabadeTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Harshada khanvilkar and mrunal deshpande

१४ वर्षांच्या मैत्रीमागची खरी कहाणी, हर्षदा खानविलकरचं मोठं विधान, म्हणाल्या, "माझ्यानंतर माझ्या आईचं करायला मृणाल आहे"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.