Tharala Tar Mag Jui Gadkari Post : ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळतेय. मालिकेत कोर्ट सिक्वेन्समुळे सध्या विशेष चर्चा सुरु आहे. अर्जुनने मधुभाऊंची केस जिंकल्याने साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. तर प्रिया आणि साक्षीला विलास खुनात अटक झाली आहे. केसचा निकाल लागणार हे कळताच प्रेक्षकांमध्ये मालिका संपणार असल्याची कुजबुज सुरु असल्याचं दिसलं. आणि त्यानंतर या चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळालं. मात्र, मालिका बंद होणार नाही असं मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना सांगितलं. मालिकेतील लोकप्रिय चेहरा सायली म्हणजेच जुई गडकरीनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना समजावलं.
“मालिकेत लीप येणार नाही आणि मालिका संपणार सुद्धा नाहीये. त्यामुळे युट्युबवरुन कृपया अशा खोट्या बातम्या पसरवू नका. सोशल मीडिया पेजेसला सुद्धा हीच विनंती आहे की, अफवा पसरवू नका. मालिका सुरुच राहील आणि आता प्रेक्षकांसमोर हळुहळू एक-एक गोष्ट उलगडत जाणार आहे. अजून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणं बाकी आहे. फक्त ‘वात्सल्य आश्रम’ केसचा निकाल लागला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, मालिका रोज बघत राहा. ठरलं तर मग’ मालिकेच्या संपूर्ण टीमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आम्ही कायम कृतज्ञ आहोत”, असं म्हटलं आहे.

याशिवाय जुईची आणखी एक पोस्ट लक्षवेधी ठरली. यामध्ये जुईने हा जुलै महिना तिच्यासाठी किती कठीण होता ते सांगितलं. जुईसाठी जुलै महिना कठीण गेला, कारण तिचं आजारपण. आजारपणातही तिनं शूटिंग केलं. मालिकेतला महत्त्वाचा ट्रॅक सुरु असतानाच जुई आजारी पडली. त्यामुळे तिला तारेवरची कसरत करावी लागली. गेल्या महिन्यात जुईला टायफॉइड आजाराचं निदाण झालं होतं. बदलत्या वातावरणामुळे सेटवर अनेकांची तब्येत बिघडलेली. सुरुवातीला तिला देखील ताप वगैरे सुरू होता. त्यानंतर टेस्ट केल्या, त्यात टायफॉइडचं निदान समोर आलं. जुईचा ताप खूप वाढला होता. तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावं लागलं होतं. ताप त्यात प्रचंड अंगदुखीचा त्रास तिला झाला.

आणखी वाचा – प्राजक्ता गायकवाडचं ठरलं! विधीदरम्यानचे फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, पण होणारा नवरा कोण?
या सर्व संकटातून बाहेर येत जुईने एक पोस्ट शेअर केली. यांत तिने तिच्यासाठी हा गेला महिना किती कठीण होता ते सांगितलं.
जुलै महिना
तू कठीण होता..
तू अनपेक्षित होता…
तू एक मोठा धडा होता…
तू मला तोडलंस..
तू मला आतून चिरलं…
आशा आहे की मला पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळेल.





