‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुन व सायली ऑफिसमध्ये कॉफी घेत असताना प्रिया ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट फाईल मिळवायच्या उद्देशाने प्रवेश करते. अर्जुन व सायली कॉफी बनवण्यात व्यस्त असताना प्रिया-अर्जुनच्या केबिनमध्ये गुपचूप प्रवेश करते. बनवलेल्या डुप्लिकेट चावीने ती त्याचा ड्रॉवर उघडून इम्पॉर्टन्ट फाईल लिहिलेली फाईल हळूच बाहेर काढते. जेव्हा प्रिया ही फाईल चेक करते तेव्हा तिला ही फाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असल्याचे लक्षात येते. हे बघून प्रियाला अत्यानंद होतो. इथे दुसरीकडे सायली व अर्जुन कॉफी पीत गप्पांमध्ये रंगून जातात. (Tharal Tar Mag Serial Update)
अर्जुन सायलीला केबिनच्या एसीबद्दल विचारणा करताच सायली केबिनकडे जाते. तेव्हा तिच्या ड्रॉवरमधून फाईल गायब झाल्याचे लक्षात येते. ती लगेच अर्जुनला बोलवून घेते. अर्जुन लगेच बाहेर जातो तेव्हा तो प्रियाला तिथून जाताना पाहतो आणि सायलीला मला आलेला संशय खरा होता, असं सांगतो. सायली व अर्जुन हळूच घरी येतात. तर मध्यरात्री प्रिया म्हणजेच तन्वी अर्जुनच्या घरी येते. प्रताप प्रियाला एवढ्या रात्री इथे कशी असे विचारताच पूर्णा आई तिला आधी घरात घ्यायला सांगते.
आणखी वाचा – मुंबईतील महागड्या ठिकाणी आमिर खानने खरेदी केलं नवं घर, एकूण किंमत आहे तब्बल…
अस्मिता काय झाले असे सारखे प्रियाला विचारत असल्याने प्रिया, “कसे सांगू, नक्की काय सांगू” असे खोटे अविर्भाव चेहऱ्यावर आणते. कल्पनासुद्धा तिला विचारते तेव्हा अखेर प्रिया तोंड उघडते. प्रिया सांगते मी इतके दिवस सांगत होती त्याचा सबळ पुरावा आणला आहे ते म्हणजे अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. चैतन्य त्यावर तिला काय बोलतेस याचं भान ठेवण्याबद्दल सांगतो. प्रिया ती फाईल पूर्णा आईच्या हातात सोपवते. हे सगळं ऐकून घरातले सगळेचजण धक्क्यात जातात. तर अर्जुन व सायली यांच्या पायाखालची जमीन सरकते.
आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, पूर्णा आई अर्जुन व सायलीकडे बघते. त्यावेळी प्रिया त्यांच्याकडे त्यांच्याकडे बघत, सत्य समोर आल्याने त्यांच्याकडे बोलण्यास उत्तर नाही, असे तो बोलतो. पण उलट पूर्णा आई प्रियाच्याच कानाखाली मारते. आता ती फाईल पाहिल्यावर सायली-अर्जुनला कोणत्या संकटातून जावं लागणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.