गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शाका लाका बूम बूम’मधील संजूला लागली हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 22, 2024 | 5:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shaka laka boom boom fame kinshuk vaidya marriage

'शका लका..,'फेम अभिनेता अडकणार लग्नबंधनात

टेलिव्हिजनवर लहान मुलांच्या आवडीच्या अनेक मालिका प्रसारित केल्या जातात. शाळेतून आलं आणि दप्तर टाकलं की सगळी मुलं ही टीव्ही चालू करुन आवडत्या मालिका पाहण्यास सुरुवात करतात. लहानपणी पाहिलेल्या मालिका सगळ्यांच्याच लक्षात असतात. अशातच आतापर्यंत सगळ्यांच्या आठवणीत राहिलेली मालिका म्हणजे ‘शाका लाका बूम बूम’. २००० साली सुरु झालेल्या मालिकेने सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. जादुई पेन्सिलच्या दुनियेत सगळ्यांचीच मन रमली जात होती. या मालिकेत मुख्य भूमिका सकारणारा संजू म्हणजेच किंशुक वैद्य हा चांगलाच चर्चेत राहिला. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. (shaka laka boom boom fame kinshuk vaidya marriage)

लवकरच किंशुक लग्नबंधनात अडकणार आहे. लग्ना आधीच्या विधीला सुरुवात झाली आहे. आज (२२ नोव्हेंबर) रोजी तो त्याची गर्लफ्रेंडबरोबर लग्न करणार आहे, त्याआधी त्याचा हळदी समारंभ पार पडला आहे. ‘इटाइम्सच्या रिपोर्ट’नुसार, किंशुक व दीक्षा नांगपाल यांचे लग्न अलिबागमध्ये होणार आहे. त्याच्या मित्र-मैत्रिणींनी त्याचे हळद व संगीत सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. दीक्षानेदेखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हळदी समारंभाचा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – वडिलांना हृदयविकाराचा झटका, कामच सोडावं लागलं अन्…; ‘तारक मेहता…’च्या सोनूवर कमी वयातच आलेली जबाबदारी, आता कसं आहे आयुष्य?

View this post on Instagram

A post shared by Aryan Sharma (@aryan953744)

 ३३ वर्षांच्या किंशुकने ऑगस्टमध्ये साखरपुड्याच्या वृत्ताने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. किंशुकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटों शेयर केला होता. यामध्ये तो व त्याची होणारी बायकोदेखील दिसून आली होती. यामध्ये दोघांच्याही साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहेत. किंशुकने निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला असून त्याच्या होणाऱ्या बायकोने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.

आणखी वाचा – ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसला कौटुंबिक जिव्हाळा, हर्षदा खानविलकरांच्या भूमिकेचं कौतुक, प्रेक्षकही भारावले

किंशुकच्या होणाऱ्या पत्नीबद्दल सांगायचे झाले तर तो आता दीक्षा नागपालबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. ती नृत्यदिग्दर्शिका असून ‘पंचायत २’ मधील एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तसेच किंशुकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने ‘वो तो है अलबेला’ या कार्यक्रमामध्ये दिसून आला होता. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. याशिवाय ‘वो अपना सा’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, जात ना पुछो प्रेम की’ व ‘कर्ण संगिनी’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Tags: kinshuk vaidyashaka laka boom boomTelevision
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Ankita Walavalkar And Dhananjay Powar

Video : अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटला डीपी, व्हिडीओ कॉल करत हडळ आहेस म्हणत चिडवलं, मजेशीर व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.