शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या दीड वर्षांनी दिली गुडन्यूज, बेबीबंपसह फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 15, 2025 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress sonarika bhadoria pregnant

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या दीड वर्षांनी दिली गुडन्यूज, बेबीबंपसह फोटो समोर

actress sonarika bhadoria pregnant : ‘देवों के देव महादेव’ फेम अभिनेत्री सोनारिका भदौरिया, हिने मालिकेत देवी पार्वतीची भूमिका साकारली होती, अभिनेत्रीने फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न केले. या जोडप्याने राजस्थानच्या रणथांबोर येथील नारगड पॅलेस येथे एका भव्य आणि शाही सोहळ्यात सात फेरे घेतले. आता लग्नाच्या सुमारे दीड वर्षानंतर, अभिनेत्रीने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री लवकरच आई होणार असल्याचं समोर आलं आहे. सोनालीकाने व्यावसायिक विकास पाराशरशी लग्न केले. आता हे जोडपे लवकरच पालक बनणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर गोंडस पोस्टद्वारे गरोदर असल्याचे जाहीर केले आहे.

१४ सप्टेंबर रोजी, सोनारिकाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे बेबीबंप दाखवत पांढऱ्या लेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये ट्विनिंग करताना फोटो शेअर केले आहेत. “आमचे आतापर्यंतचे सर्वात मोठे साहस” असे कॅप्शन तिने या पोस्टसह दिले आहे. अभिनेत्रीने आनंदाची बातमी दिल्याने, सोनारिकाचे चाहते खूप उत्साही आहेत आणि ते तिचे अभिनंदन करीत आहेत.

आणखी वाचा – दिवसाढवळ्या प्रायव्हेट पार्ट दाखविला अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह वाईट कृत्य, परदेशात घडली घटना

View this post on Instagram

A post shared by Sonarika Bhadoria (@bsonarika)

सोनारिकाने एका मुलाखतीत खुलासा केला की, २०२४ मध्ये विकासशी लग्न करण्यापूर्वी तिने सात वर्ष त्यांना डेट केले. लग्नानंतर इटाइम्सशी बोलताना ते म्हणाले, “आम्ही याबद्दल अनेकदा बोलत राहतो, जेणेकरुन आम्हाला असे वाटू नये की आम्ही विवाहित आहोत. ही भावना अजून आलेली नाही. मला वाटते की आम्हाला ते अजून कळलेले नाही, आम्ही इतके दिवस एकत्र आहोत. एके दिवशी मी माझ्या मावशीच्या घरी जेवायला गेले होते आणि माझी मावशी म्हणाली की तुम्हा दोघांना पाहून असे वाटत नाही की तुम्ही विवाहित जोडपे आहात. मी आनंदी आहे आणि आशा आहे की हे असेच चालू राहील”.

आणखी वाचा – बसमध्ये भेट, घरच्यांचा विरोध अन…; १६ वर्षांच्या सुखी संसाराबाबत बोलले गिरीश ओक, पत्नीसह असं जुळलं की…

सोनारिका आणि विकासची भेट जिममध्ये झाली. विकास सोनारिकाच्या भावाचा मित्र होता. येथूनच त्यांचे नाते सुरु झाले. सोनारिका भदोरियाने २०११ मध्ये ‘तुम देना साथ मेरा’ या कार्यक्रमासह दूरदर्शनवर काम सुरु केले. पण ‘देवों के देव … महादेव’ या कार्यक्रमात देवी पार्वतीच्या व्यक्तिरेखेने तिला खूप लोकप्रियता मिळाली. तिच्या चेहऱ्यावरील निरागसतेने प्रेक्षकांना खूप आकर्षित केले.

Tags: actress pregnantSonarika Bhadoriatelevision news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Abhishek Deshmukh post

अभिषेक देशमुखकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, मालिकेतील पदार्पणाआधी दिला सल्ला, म्हणाला, "फक्त स्पर्धा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.