Parag Tyagi Shefali Jariwala : अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे जून २०२५ मध्ये निधन झाले आणि तिच्या निधनाने पराग त्यागीवर दुःखाचा डोंगर कोसळला. यानंतर अभिनेता बराच खचलेला दिसला. पत्नीच्या जाण्याच्या मोठ्या दुःखातून सावरत आता मात्र पराग त्यागी कामावर परतला आहे. पत्नीच्या मृत्यूच्या आठ महिन्यांनंतर, त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या आगामी प्रोजेक्टचा एक प्रोमो व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने शोचे नाव ‘चंदनबाला’ असे नमूद केले आहे. मात्र, तो कधी येणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आणि त्याच्या कामावर परतल्याबद्दल चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
शेफाली जरीवालाच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. लेकीच्या जाण्याचे दुःख पचवता आलं नाही त्यामुळे तिच्या आईची प्रकृती बिघडली होती. त्याचवेळी पराग त्यागीही तिच्या आठवणीमध्ये भावुक दिसला. तिचा फोटो त्याच्या छातीवर कोरण्यापासून ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या भावना जिवंत ठेवण्यापर्यंत तो व्यस्त होता. मात्र आता या सगळ्यातून बाहेर येत आता त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे.
आणखी वाचा – रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात चार आरोपींना अटक, एक हल्लेखोर गोळीबार करताना दिसला; CCTV फुटेज समोर
त्याने त्याच्या ‘चंदनबाला’ शोचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका दमदार भूमिकेत दिसत आहे. या पोस्टवर आरती सिंहने त्याला ‘ऑल द बेस्ट ब्रदर’ असं म्हटलं आहे. अभिनेत्री जसवीर कौरही, “तेजस्वी”, असं म्हणाली. त्याचवेळी चाहत्यांनीही त्याला साथ दिली आणि त्याने खूप प्रगती करावी असे सांगितले. एका यूजरने लिहिले की, “ऑल द बेस्ट सर”. तर आणखी एकाने लिहिले, “तुम्ही असेच वागत राहा, शेफालीच्या आत्म्याला शांती मिळेल”. तर एकाने लिहिले, “फुल सपोर्ट”. एकाने लिहिले, “वाह, ही मालिका कधी येणार आहे? आम्ही प्रतीक्षा करु शकत नाही”.
आणखी वाचा – “मी सदस्यांशी जुळवून…”, सोनाली राऊतची घरातून एक्झिट, बाहेर पडताच म्हणाली, “माझ्याकडून खूप अपेक्षा…”
पराग त्यागीने ‘पवित्र रिश्ता’मधून करिअरला सुरुवात केली. यानंतर तो ‘ब्रह्मराक्षस’, ‘जोधा अकबर’ आणि ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’मध्ये दिसला. याशिवाय त्यांनी हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘अ वेनस्डे’ या थ्रिलर चित्रपटातून त्याने पदार्पण केले आणि त्यानंतर तो ‘सरकार 3’मध्ये दिसला. ‘अग्न्याथावासी’ या तेलगू चित्रपटातही तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसला होता. शेफाली जरीवालाला ‘काटा लगा’ या गाण्याने लोकप्रियता मिळाली. २८ जून रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. तिने ‘बिग बॉस १३’ मध्येही सहभाग दर्शविला. ती सलमान खानच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातही दिसली होती आणि त्यानंतर तिने ‘बेबी कम ना’ या वेब सीरिजमध्ये काम केले होते.




