टेलिव्हिजन व बॉलिवूड निर्माती, दिग्दर्शिका एकता कपूर ही सध्या खूप चर्चेत आली आहे. आजवर एकताने अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. तिच्या सगळ्याच मालिकांना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळाली आहे. एकता सोशल मीडियावर खूप कमी प्रमाणात सक्रिय असलेली दिसते. मात्र ती कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो शेअर करते. अनेकदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. खूपवेळा तिला तिच्या लूकवरुन ट्रोलही केले जाते. अशातच तिचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगताना दिसत आहे. मात्र तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे काही दिसले ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (ekta kapoor viral video)
एकताने इंन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती ज्योतिषी व तिच्या औषधांबद्दल सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघून मनोरंजनसृष्टीतील तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी तिचे कौतुक केले आहे तर अनेकांनी आश्चर्यदेखील व्यक्त केले आहे. एकताने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझी आवड सप्लीमेंट, औषधं, आरोग्य व ज्योतिष. नक्कीच हे कंटेंटनंतर, जय माता दी”. एकताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती घरातील एका कोपऱ्यातील खूप अशी औषधं दाखवत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली की, “मला वाटतं की काही वर्षातच मी यामध्ये शिफ्ट होणार आहे. आज मी मला जास्त काय करायला आवडतं? याबद्दल सांगणार आहे. ज्योतिष व औषधं हे मला आवडतं. मी मेडिसीनचा अभ्यास करत आहे. हा माझा आवडता विषय आहे आणि वाढत्या वयाला कसं थांबवायचं हा विषयदेखील अधिक आवडतो”.
एकताचा हा व्हिडीओ समोर येताच एका नेटकऱ्याने लिहिले की, “का? ही औषधांचा अभ्यास करण्याची योग्य पद्धत आहे का? कॉलेजला जा, एखाद्या अनुभवी माणसाकडून शिका आणि फार्मास्युटिकल मेडिसीनमध्ये डिप्लोमाची डिग्री घेण्याची ही योग्य पद्धत नाही. तुमच्याकडे खूप औषधं आहेत. ही औषधं वापरुन तुम्ही काही प्रयोग करत नसाल ही आशा”. तसेच अजून एकाने लिहिले की, “एकता तुम्हाला इतक्या औषधांची का गरज आहे?”. दरम्यान एकताचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.