बुधवार, जून 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर हिना खानने सनातन धर्म स्वीकारला?, अभिनेत्याने केलं अभिनंदन, अभिनेत्रीचा ‘तो’ फोटो पाहून चर्चांना उधाण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
KRK Congratulates Hina Khan

लग्नानंतर हिना खानने सनातन धर्म स्वीकारला?, अभिनेत्याने केलं अभिनंदन, अभिनेत्रीचा 'तो' फोटो पाहून चर्चांना उधाण

KRK Congratulates Hina Khan : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री हिना खान आजकाल चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे लग्न. १३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हिना खान तिचा प्रियकर रॉकी जयस्वालशी लग्नबंधनात अडकली. हिना खानने नोंदणी पद्धतीने तिचा लग्नसोहळा उरकला. तिने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. लग्नावेळी हिना खानने मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेली साडी नेसली होती. तिच्या हातावरील सुंदर मेहंदी आणि तिचा हटके लूक नवऱ्या मुलीच्या रुपात भर घालत होते.

हिना खानचा ब्राइडल लूक बर्‍यापैकी व्हायरल होता. हिनाच्या लग्नाबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. प्रत्येकजण तिचे अभिनंदन करीत आहेत. लग्नानंतर हिना आणि रॉकीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिना आणि रॉकीच्या कपाळावर टिळा दिसत आहे. फोटो शेअर केल्यानंतर केआरकेने सनातन धर्म स्वीकारल्याबद्दल हिना खानचे अभिनंदन केलेलं आहे. हिना खान ही मुस्लिम कुटुंबातील मुलगी आहे. तर रॉकी जयस्वाल हा हिंदू कुटुंबातील आहे. लग्नानंतर आता हिनाने सनातन धर्म स्वीकारला असल्याच्या चर्चा त्या फोटोवरुन रंगल्या आहेत.

आणखी वाचा – आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी करतेय शूट, नेहमी सलाईन लावते अन्…; स्वतःच सांगितली परिस्थिती

Hina Khan Ko Sanatan Dharma Apnaane Ke Liye Badhai.👏 pic.twitter.com/k3CoKdqmBN

— KRK (@kamaalrkhan) June 8, 2025

हिना खान स्तनाच्या कर्करोगाने झगडत आहे. तिने सोशल मीडियावर कर्करोगाबद्दल माहिती दिली. तेव्हापासून, ती सतत कर्करोगाच्या लढाईचा प्रवास शेअर करीत आहे. या लढाईत हिनाने अजिबात धैर्य गमावले नाही. तिचा नवरा रॉकी जयस्वालने या कठीण काळात हिनाला पूर्णपणे साथ दिली. रॉकी नेहमीच तिच्याबरोबर राहिला. जेव्हा हिनाने आपले केस कापले तेव्हा रॉकीनेही स्वतःचे केस कापले.

आणखी वाचा – “आता आवाज उठवण्याची वेळ…”, ‘पारू’ फेम अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाला, “तक्रार नोंदवली तर काम…”

हिना आणि रॉकी ‘ये रिश्ता क्या केहलता है’च्या सेटवर एकमेकांना भेटले. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. चाहत्यांना दोघांची जोडी आवडते. हिना खान बर्‍याचदा रॉकीला भेटायला जात असत. त्यांचे फिरतानाचे अनेक फोटो व्हायरल होतात. आता हिना आणि रॉकी लग्नामुळे चर्चेत आहेत. लग्नानंतर कोणताही ब्रेक न घेता अभिनेत्री कामावर परतली. आजारपण आणि तिने घेतलेला हा लग्नाचा निर्णय पाहता चाहतेमंडळी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Tags: entertainmenthina khantelevidion actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dipika Kakar in hospital
Entertainment

Video : दीपिका कक्करला रुग्णालयाच्या बेडवर पाहून हळहळला दोन वर्षाचा लेक, हात सुजलेला दाखवला अन्…; भावुक क्षण समोर

जून 10, 2025 | 6:30 pm
Paaru fame sharayu sonawane
Entertainment

Video : नवरा, घरापासून दूर असलेल्या पारूने सेटवरच साजरी केली वटपौर्णिमा, शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधूनही वेळ काढत जपली परंपरा

जून 10, 2025 | 6:00 pm
genelia deshmukh Vat purnima
Entertainment

देशमुखांच्या सूनेचे संस्कार, जिनिलीया देशमुखने परंपरा जपत घरच्या घरीच साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, “नवरा…”

जून 10, 2025 | 5:15 pm
Vat Purnima 2025
Entertainment

“तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?”, वटपौर्णिमा साजरी करण्यावरुन अंकितावर भडकली चाहती, दिलं सडेतोड उत्तर

जून 10, 2025 | 4:24 pm
Next Post
Madhurani prabhulkar talk about marriage system

“नातं टिकलं नाही तरी दोष स्त्रियांनाच आणि...”, लग्नाबाबत ‘आई कुठे...’ फेम मधुराणीचं वक्तव्य, म्हणाली, “नाजूक वयात निर्णय...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.