virat kohli and tamannaah bhatia affairs : भारतीय सिनेमा विश्वातील सर्वात लोकप्रिय चेहर्यांपैकी एक, तमन्ना भाटिया नेहमीच तिच्या अभिनयाने चर्चेत राहिली. याशिवाय ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. मोठ्या स्क्रीनपासून ते ओटीटीपर्यंत, बर्याच भाषांमध्ये अभिनेत्रीची कारकीर्द घडली. अभिनेत्रीबरोबर असे घडते की तिच्याबद्दलच्या बातम्या सतत कानावर येत आहेत. अखेर लल्लनटॉपशी झालेल्या संभाषणात, ‘आज की रात’ स्टारने शेवटी बर्याच काळापासून सुरू असलेल्या अफवांचा अंत केला आहे. क्रिकेटर्स विराट कोहली आणि अब्दुल रझाक यांच्याबरोबर अभिनेत्रीच नाव जोडले गेले अखेर या अफवांवर आता तमन्नाने भाष्य केलं आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे नाव भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबरोबर जोडले गेले. नेमकं सत्य काय यामागचा खुलासा आता अभिनेत्रीने केला आहे. तमन्ना म्हणाली, “मला खूप वाईट वाटतंय कारण मी त्याला फक्त एका दिवसासाठी भेटले होते. त्या शूटनंतर मी विराटला भेटलेच नाही. मी त्याच्याशी बोललेही नाही किंवा त्याला भेटलेही नाही”. २०१० मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यानचे तमन्ना आणि विराट कोहली यांचे फोटो व्हायरल झाले, ज्यामुळे दोघेही डेटिंग करीत असल्याच्या अफवा पसरल्या. परंतु तमन्नाने पुष्टी केल्याप्रमाणे, ते फक्त एक व्यावसायिक संभाषण होते, त्यापेक्षा वेगळे काहीच नव्हते.
आणखी वाचा – एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होऊ शकतात ‘हे’ आजार, गंभीर समस्या अन्…
या मुलाखतीत ती पुढे म्हणाली, “मस्करी मस्करीत माझं अब्दुल रझाकबरोबरही लग्न झालं. इंटरनेट ही एक मजेदार जागा आहे. तुम्ही माझे लग्न अब्दुल रझाकशीही केले”. यानंतर तमन्नाने कॅमेऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली, “माफ करा अब्दुल रझाक सर. तुम्हाला दोन-तीन मुले आहेत. तुमचे आयुष्य काय आहे हे मला माहित नाही”.
आणखी वाचा – ४२ व्या वर्षीही तजेलदार त्वचा असणाऱ्या कतरीना कैफच्या सौंदर्याचे रहस्य काय?, सासूबाईंनी बनवलेलं घरगुती तेल…
शेवटी तमन्ना म्हणाली, “अशा अफवांना तोंड देणे कठीण असते. जेव्हा तुमचा त्या व्यक्तीशी काहीही संबंध नसतो आणि तरीही लोक अफवा पसरवतात तेव्हा ते खूप विचित्र असते. पण तुम्ही काहीही करु शकत नाही. तुम्ही काहीही करु शकत नाही ही गोष्टसुद्धा स्वीकारण्यास वेळ लागतो. लोक त्यांना काय हवे ते विचारत राहतील. तुम्ही बसून कोणावरही नियंत्रण ठेवू शकत नाही”.





