बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिक्षणासाठी न्यूयॉर्क गाठलं, एकटाच राहण्याची वेळ आली अन्…; ‘तारक मेहता…’मधील गोली आता जगतोय असं आयुष्य, मालिकेच्या एक्झिटनंतर…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 25, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kush Shah New York

शिक्षणासाठी न्यूयॉर्क गाठलं, एकटाच राहण्याची वेळ आली अन्…; 'तारक मेहता...'मधील गोली आता जगतोय असं आयुष्य, मालिकेच्या एक्झिटनंतर...

Kush Shah New York : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेता कुश शाह मालिका सोडल्यानंतर आता अमेरिकेत गेला आहे. शोमध्ये त्याने गोलीची भूमिका साकारली होती. कुशची गोली ही भूमिका बरीच चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. त्याचं बालिश बोलणं, सततच खाणं, खाण्याबद्दलच्या चर्चेत प्रथम सहभाग घेणं या गोष्टी आता प्रेक्षकही मिस करत आहेत. त्याने तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो सोडला आहे. आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. मात्र भारत सोडून गेल्यानंतर त्याला तेथील राहणीमानाबाबत काय वाटतं?, तो तिथं रुळला आहे का?, याबाबत त्याने स्वतःच एका पॉडकास्टमध्ये भाष्य केलं आहे.

अलीकडे, कुशने शाश्वत महेश्वरीसह पॉडकास्टमध्ये न्यूयॉर्कच्या जीवनशैलीबद्दल बोलला आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणात कुश शाह म्हणाला, “सुदैवाने मी एकटाच राहत आहे कारण ज्याला माझ्याबरोबर खोली शेअर करावी लागली होती तो कधीच आला नाही. म्हणून मला संपूर्ण जागा एकट्याला मिळाली आहे. मी न्यूयॉर्कमध्ये एकटाच राहत होतो. माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे कारण नंतर मला समजले की, बेडवर अन्न खाल्ल्यामुळे घरात झुरळ झाले”.

आणखी वाचा – मालिकेत अपघात, मृत्यूचा सीन शूट होताना कलाकारावर नारळ ओवाळून काढतात नजर, मराठी अभिनेत्रीने दाखवलं सत्य

View this post on Instagram

A post shared by Kush Shah (@iamkushshah_)

त्याने पुढे सांगितले, “मी तीन महिन्यांत सर्व काही शिकलो आहे. आजवर मला सर्वकाही माझ्या हातात मिळालं आहे. मी लहानपणापासून पालकांबरोबर राहत होतो आणि लक्झरी आयुष्य जगत होतो. परंतु न्यूयॉर्कमध्ये सर्व काही स्वतःच करत आहे. आणि तेव्हाच मला माझी चूक काय आहे ते समजत आहे. पलंगावर अन्न खाण्यापासून झुरळे होतात. मी झोपायच्या आधी भांडी धुतली नाहीत की झुरळ होतात. आणि या लहानसहान गोष्टी किती कठीण आहेत हे मला समजण्यास मदत झाली. खरं सांगायचं तर, मी यासाठी स्वत: वर खूप रागावलो आहे”.

आणखी वाचा – “हिंदीची कॉपी का केली?”, तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेच्या प्रोमो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स, म्हणाले, “ओरिजिनल असं…”

कुश म्हणाला, “हे न्यूयॉर्क आहे. मी खूप विचलित होतो. हे जग पाहून मी वेडा होतो. पण मला प्रामाणिकपणे वाटते, मला असे वाटते की मला टाईम्स स्क्वेअरपेक्षा घाटकोपर अधिक आवडतं. न्यूयॉर्कबद्दल आपण काय म्हणता हे महत्त्वाचे नाही, टाइम्स स्क्वेअर खरोखर एक भयानक जागा आहे”. जेव्हा कुश शाह लहान होता तेव्हा तो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमध्ये सहभागी झाला. त्यावेळी तो पाचवी इयत्तेत शिकत होता. शो बरोबरच तो मोठा झाला. शोमध्ये, त्याने त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं.

Tags: actor lifestylekush shahTaarak mehata ka ooltah chashamah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
lataa saberwal sanjeev seth

१५ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर लता सभरवाल यांची पहिली पोस्ट, म्हणाल्या, “सुंदर चेहरा शोधणे सोपे पण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.