बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’च्या जेठालालचा ओळखणंही झालेलं कठीण, ३३ वर्षांपूर्वीचा फोटो समोर, दीड महिन्यात तब्बल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 10, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dilip joshi weight loss

'तारक मेहता…'च्या जेठालालचा ओळखणंही झालेलं कठीण, ३३ वर्षांपूर्वीचा फोटो समोर, दीड महिन्यात तब्बल…

dilip joshi weight loss : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय शोने रसिकांच्या मनात घर केलं. गेली अनेक वर्ष हा शो अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमधील सर्वच पात्रांनी स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. या शोमधील नेहमीच चर्चेत असणारं आणि लोकप्रिय पात्र म्हणजे जेठालाल. जेठालाल ही भूमिका मालिकेत अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत. या भूमिकेतून ते अगदी मालिकेच्या पहिल्या दिवसापासून समोर आले आहेत. मालिकेत जेठालाल फिटनेसची जराही आवड नसलेले, नेहमीच जिलेबी,फाफडा आणि अन्य बाहेरचे पदार्थ खाणारे आहेत, मात्र खऱ्या आयुष्यात एका भूमिकेसाठी दिलीप यांनी कठोर मेहनत घेत तब्बल १६ किलो वजन कमी केले.

दिलीप जोशी यांनी चक्क दीड महिन्यात १६ किलो वजन कमी केले आणि साऱ्यांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्याने याबाबत प्रेक्षकांना, चाहत्यांना सांगितले की, त्याने त्याचे वजन कसे कमी केले. त्यांनी ३३ वर्षांपूर्वी गुजराती चित्रपटासाठी हा पराक्रम केला. २०२३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्याने वजन कमी कसे झाले याबद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा – चार-पाच तास शस्त्रक्रिया, लघवीची पिशवी हातात अन्…; बॉबी डार्लिंगच्या लिंग बदलाच्या सर्जरीचा थरारक अनुभव, कठीण परिस्थिती आणि…

दिलीप जोशीने ‘मैशेबल इंडिया’ ला सांगितले होते की, ते कामावर जात असत. स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलायचे आणि पावसात मरीन ड्राईव्ह पासून ओबेरॉय हॉटेलमध्ये पळायचे. दिलीप जोशी यांच्या म्हणण्यानुसार, ते संपूर्ण रस्त्यावर जॉगिंग करत असत आणि यासाठी त्यांना ४५ मिनिटे लागत. अशाप्रकारे, दिलीप जोशी यांनी दीड महिन्यांत म्हणजेच ४५ दिवसांत १६ किलो वजन कमी केले. १९९२ मध्ये आलेल्या ‘हुन हुंशी हंशीलाल’ या गुजराती चित्रपटात त्यांना एका विशिष्ट साच्यात दिसायचे होते म्हणून भूमिकेच्या आवश्यकतेनुसार त्यांनी त्यांचे वजन कमी केले.

आणखी वाचा – शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर स्वतःला सावरणं पतीला झालंय कठीण, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट समोर, म्हणाला…

दिलीप जोशी यांच्या कारकीर्दीबद्दल बोलताना त्यांनी बॅकस्टेज कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. मग त्यांना भूमिकेसाठी ५० रुपये मिळायचे. गुजराती चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. तो ‘मैंने प्यार किया’ आणि ‘हम आपके हैं कौन’ सारख्या चित्रपटात ते छोट्या भूमिकेतून मोठ्या पडद्यावर दिसले. २००८ मध्ये दिलीप जोशी यांना ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची ऑफर देण्यात आली आणि जेठालालच्या पात्राने त्याचे आयुष्य बदलले. या भूमिकेसह दिलीप जोशी घराघरांत प्रसिद्ध झाले. जेठालालच्या भूमिकेसाठी दिलीप जोशीने आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार जिंकले. अहवालानुसार, दिलीप जोशीची संपत्ती सुमारे ४७ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. सन २०२३ मध्ये, त्याच्या किंमतीत १३५ % वाढ झाली.

Tags: dilip joshifitnessTaarak mehata ka ooltah chashamah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Shubhangi Atre on Ex Husband

सतत मद्यपान, चिडचिड आणि…; 'भाभीजी घर पर हैं' फेम अभिनेत्रीचा पूर्वाश्रमीच्या नवऱ्याबाबत खुलासा, म्हणाली, "घटस्फोटानंतरही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.