मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘तारक मेहता…’मधील भिडेच्या लेकीने विशीमध्येच खरेदी केली दुसरी महागडी कार, आई-वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 16, 2024 | 3:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
palak sindhvani baught new car

Video : 'तारक मेहता…'मधील भिडेच्या लेकीने विशीमध्येच खरेदी केली दुसरी महागडी कार, आई-वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण, व्हिडीओ व्हायरल

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील कलाकारांबरोबरचं मालिकेतील पात्रांनी मालिकेच्या प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. या टीव्ही मालिकेतून सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानी हिचा नुकताच २६ वा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त सोनूने म्हणजेच पलकने आलिशान कार खरेदी केली. गाडी घेतल्याने पलकच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण तिने स्वतःच्या पैशाने ही कार घेत तिच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. पलक सिधवानीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबाबतचे अपडेट चाहत्यांसह शेअर केले आहेत. (palak sindhvani baught new car)

नवीन गाडी खरेदी करण्यासाठी पलक तिच्या आई-वडिलांबरोबर शोरूममध्ये पोहोचली. तेथे त्यांनी गाडीची छोटी पूजा केली आणि मग केक कापून नवीन कार खरेदी केल्याचा आनंद साजरा केला. पलकची ही दुसरी कार आहे. याआधी २०२१ मध्ये तिने एक कार खरेदी केली होती आणि तिच्या वडिलांना त्यांच्या वाढदिवशी ती कार भेट दिली होती. तेव्हा पलकने भावुक पोस्ट करत सांगितले होते की, ही कार फारशी महाग नाही, पण तिच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यात तिला खूप आनंद झाला. कारण ही त्यांच्या कुटुंबातील पहिली कार होती.

आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्याच्या पहिल्या वाढदिवसाचं ऑस्ट्रेलियामध्ये जंगी सेलिब्रेशन करतेय पूजा सावंत, हातातील हिरव्या चुड्याने वेधलं लक्ष, म्हणाली, “ज्याने माझं आयुष्य…”

View this post on Instagram

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

आता पलक सिधवानीने तिच्या २६व्या वाढदिवसाला दुसरी कार खरेदी केली आहे. पलकने तिच्या नव्या गाडीची किंमत जाहीर केली नसून ती कार महाग नसून बजेटमध्ये असल्याचे सांगितले. व्हिडीओमध्ये पलकने असेही सांगितले की, आईला रुफटॉप कार हवी आहे आणि वडिलांना मोठी कार हवी आहे. तर तिला आणि तिच्या भावाला त्यांच्या आई-वडिलांचे सुख हवे होते. अशा परिस्थितीत आई-वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचा तिला खूप आनंद झाला. याबाबत तिने देवाचेही आभार मानले आहेत.

आणखी वाचा – “तो माझा देव, माझी जीव घ्या पण…”, सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला राखी सावंतला सहन होईना, म्हणाली, “खरं काय माहित नाही तरीही…”

पलक ११ एप्रिल रोजी २६ वर्षांची झाली. वाढदिवसादिवशी तिने एक भव्य पार्टी दिली होती. या पार्टीत नाविका कोटिया, सचिन श्रॉफ व सुनैना फौजदार उपस्थित होते. मात्र, ‘तारक मेहता…’ची ‘टप्पू सेना’ पलकबरोबर दिसली नाही.

Tags: entertainmentpalak sindhvani baught new carpalak sindhwwaniTaarak Mehta Ka Ooltah Chashmah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Maharashtrachi Hasyajatra fame actor Prathamesh Shivlakar bought a new luxurious car

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने खरेदी केली लाखो रुपयांची कार, आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "अट्टाहास केला..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.