‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका गेले अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या अधिक जवळच्या आहेत. जेठालाल, दयाबेन, बापुजी आशा अनेक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र मधल्या काळामध्ये अनेक कलकारांनी या मालिकेला रामराम केला. मि.सोढी, डॉ.हाती, सोनू, टप्पू असे अनेक कलाकार बदलले दिसले. अशातच आता अजून एक कलकार या मालिकेतून गायब असलेले दिसून आले आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या आठवड्यात एक अभिनेता दिसणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.(taarak mehta ka oolta chashma abdul updates)
या मालिकेतील अब्दुल आता भूमिका साकारताना दिसणार नाहीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही भूमिका अभिनेता शरद सांकला हे साकारत आहेत. आतापर्यंत अनेकदा शरद मालिका सोडणार असल्याच्या अनेक चर्चा समोर आल्या. मात्र मालिकेच्या निर्मात्यांकडून असे काहीही होणार नसल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मालिका सुरू झाल्यापासून शरद या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहेत. सुरुवातीला त्यांना दिवसाचे ५० रुपये मिळत असत. पण आता ते मुंबईमध्ये दोन हॉटेलचे मालक आहेत.
शरद सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. त्यांची शेवटची पोस्ट ‘तारक मेहता…’ मालिकेच्या सेटवर सकारात्मक वाटत असल्या संदर्भातील होती. त्यामुळे या ते आता मालिका सोडतील अशी काहीही शक्यता नाही. गेल्या चार भागांमध्ये अब्दुल गायब असल्याचे दाखवण्यात आले आहे. या मालिकेत असणारी माधवीदेखील अब्दुलबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न करते पण फोन लागत नाही. यामुळे मालिकेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यासाठी ते पोलिसांचीदेखील मदत घेतात. मात्र अब्दुल परत येईल असा अंदाज सगळेजण लावताना दिसत आहेत.
दरम्यान, याआधी देखील मालिकेतून डॉ.हाथी यांचा मुलगा गोली गायब झाला होता. हे सगळं कुश शाहच्या रिप्लेसमेंटसाठी केले गेले होते. कुश त्याच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आहे. तसेच अब्दुल बाहेर जाण्याची अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे आता अब्दुल बदलणार? की त्याच्या बदल्यात दुसरं कोणी भूमिका सकरणार हे पाहण्यासारखे आहे.