मनोरंजन विश्वात एकापाठोपाठ कलाकार मंडळी ‘आमचं ठरलं’ म्हणत गुडन्यूज देत आहेत. सुरुवातीला प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत दोघांचा एकत्र फोटो शेअर करत गुडन्यूज दिली. तसेच अमृता देशमुख व प्रसाद जवादे यांनीही साखरपुडा उरकला असून थेट लग्नाची तारीख जाहीर केली. त्यांच्या पाठोपाठ आता कलाक्षेत्रातील दोन कलाकारांनी गोड बातमी शेअर केली आहे. हे दोन कलाकार म्हणजे छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी. ‘आमचं ठरलं’ म्हणत स्वानंदी आणि आशिष यांनी नात्याची कबुली दिली. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. (Swanandi Tikekar Engagemet)
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि ‘इंडियन आयडॉल’ फेम आशिष कुलकर्णी या जोडप्याने शुक्रवारी एक पोस्ट शेअर करत लवकरच एंगेजमेंट करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर काल त्यांनी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा साखरपुडा सोहळा उरकला. त्यांनी या सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पाहा लग्नाबाबत काय म्हणाली स्वानंदी (Swanandi Tikekar Wedding)
स्वानंदीने साखरपुड्यांनंतर तिच्या व आशिषला मिळालेल्या प्रेमाबद्दल एका मुलाखतीत भावना व्यक्त केल्या आहेत, “आमच्या सोशल मीडिया पोस्टवर आमच्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्हाला खरोखर खूप चांगलं वाटत आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. सध्या मी एवढंच सांगू शकते की मी खूप आनंदी वातावरणात आहे. मी आमच्या आयुष्यातील एका फ्रेश, नव्या अध्यायाची वाट पाहत आहे. आशिष आणि मी आमच्या जवळचे मित्र आणि कुटुंबियांसोबत हा खास वेळ घालवत आहोत,” असं म्हटलं आहे.(Swanandi Tikekar Wedding)
स्वानंदी आणि आशिषच्या साखरपुड्यासाठी काढण्यात आलेल्या मेहंदीचे अनेक फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चाहत्यांनी त्यांच्या या फोटोसला विशेष पसंती दर्शविली.(Swanandi and Ashish wedding)
हे देखील वाचा – “चोरी चोरी छुपके छुपके” प्रसाद-अमृताने थेट जाहीर केली लग्नाची तारीख
स्वानंदीच्या ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई’ या सुकन्या मोनेंसोबतच्या मालिकेची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळाली. मात्र या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तर आशिषने त्याच्या गायनातून ‘सारेगमप’, ‘इंडियन आयडॉल’ हे रिऍलिटी शो गाजवले. ही कलाकार जोडी आता लग्नबंधनात केव्हा अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.
