बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फोन नाही, बोलावलं सुद्धा नाही…”, ‘झी चित्र पुरस्कार’ला न बोलावण्यावरुन सूरज चव्हाणची नाराजी, म्हणाला, “माझं कॅरेक्टर प्ले…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 16, 2026 | 11:20 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Suraj chavan on zee chitra gaurav awards 2026

"फोन नाही, बोलावलं सुद्धा नाही…", 'झी चित्र पुरस्कार'ला न बोलावण्यावरुन सूरज चव्हाणची नाराजी, म्हणाला, "माझं कॅरेक्टर प्ले…"

Suraj chavan on zee chitra gaurav awards 2026 : ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२६’ची बरेच दिवसांपासून चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. अखेर काल ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२६’ चा हा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी कलाकारांचे स्किट्स, डान्स पाहणं रंजक ठरलं. यावेळी भाऊ कदम, निलेश साबळे यांनीदेखील एक स्किट सादर केलं. आणि या स्कीटदरम्यान ‘बिग बॉस मराठी’ विजेता सूरज चव्हाणची नक्कल करण्यात आली. हा व्हिडीओ पाहून आता सूरजने व्हिडीओ शेअर करत त्याचं मत मांडलं आहे. सूरज चव्हाणने व्हिडीओ शेअर करत सोहळ्याला बोलावलंसुद्धा नाही, असं म्हणत खंत व्यक्त केली आहे. सूरजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर कमेंट करत त्याची बाजू सांभाळली आहे.

सूरज चव्हाण व्हिडीओ शेअर करत म्हणाला की, “काही कारणास्तव हा व्हिडीओ बनवावा लागतोय. माझं मन प्रचंड दुखावलंय. ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात माझं कॅरेक्टर प्ले करण्यात आलं, याचा मला प्रचंड आनंद आहे. पण, माझ्या मनात एक खंत आहे. जी गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. झी चित्र गौरवची टीम ही सगळी मंडळी फार मोठी आहेत. त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाही. पण, मला त्यांनी बोलावलं असतं आणि कुठल्या तरी कोपऱ्यात जरी बसवलं असतं तरी मला बरं वाटलं असतं. पण, मला फोनही केला नाही, बोलावलं सुद्धा नाही. हे पाहून माझं मन दुखावलंय. मी माझ्या चाहत्यांना देव मानतो. तुमच्या मनात आहे ना मी टॉपचा किंग, त्यामुळे मी जो आहे तो माझ्या आई-वडिलांमुळे आणि संपूर्ण महाराष्ट्रामुळे आहे”.

आणखी वाचा – “तिची खूप आठवण येते, आठ वर्षांचं रिलेशन…” एक्स पत्नी रिद्धी डोगराच्या आठवणीत राकेश बापट भावुक

पुढे सूरज म्हणाला, “त्या लोकांनी सूरज चव्हाणचं कॅरेक्टर एक नंबर केलं आहे. मलाही या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे. माझे फॅन्स ते कॅरेक्टर पाहून खूप हसतील, ते खूश मी सुद्धा खूश! पण मला एक खंत आहे, तो सोहळा सुरु असताना एका तरी बाजूला मी कुठेतरी पाहिजे होतो, एवढीच माझी अपेक्षा होती. माझ्या फॅन्सना मी देव मानतो आज मी तुम्हाला आणि माझ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न विचारतो, त्यांनी मला सोहळ्याला बोलावलं पाहिजे होतं की नाही? खरं सांगा’ असं म्हणत सूरज चव्हाणने खंत व्यक्त केली आहे.

Tags: marathi channelSuraj Chavanzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
Next Post
Sankarshan Karhade Brother Post

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता झाला बाबा, कऱ्हाडेंच्या घरी चिमुकल्याचं आगमन, पहिली झलक समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.