Sunita Ahuja On Relationship : गेल्या कित्येक महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वेगळ्या होण्याच्या बातम्या कानावर सतत येत आहेत. मात्र त्यांच्या नात्याबाबत दोघांनीही काहीही उघडपणे सांगितलेले नाही. दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाची पत्नी सुनीताने अनेक मुलाखतींमध्ये सप्ष्टपणे भाष्य केलं. सुनीता मुलाखतींमध्ये असे म्हणताना दिसली आहे की, कोणीही तिच्यापासून गोविंदाला वेगळे करु शकत नाही. आता नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सुनिताने पुन्हा एकदा गोविंदाशी असलेल्या नात्याबद्दल भाष्य केले आणि सांगितले की, त्यांच्या नात्याला कोणाची तरी नजर लागली आहे.
यावेळी बोलताना सुनीताला तिच्या सासू-सासऱ्यांचे शब्दही आठवले जे त्यांनी त्यांचा मुलगा गोविंदाला सांगितले होते, “जर तू सुनीताला सोडलंस तर तू भिकारी होशील”. काही महिन्यांपूर्वी असे वृत्त होते की सुनिता अहुजाने पती गोविंदा यांच्या न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता, तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. सुनिता आणि गोविंदा वेगवेगळे राहत असल्याच्याही अनेक बातम्या समोर आल्या ज्याचा त्यांच्या नाते संबंधांवर परिणाम झाला.
सुनीताने ‘डेन टॉक्स विथ आसिफ’ यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा गोविंदा प्रेमात पडला तेव्हा मी १५ वर्षांची होते. माझ्या वडिलांना मी गोविंदाशी लग्न करावे हे मान्य नव्हते. तो माझ्या लग्नालाही आला नाही. मी इंडस्ट्रीच्या बाहेर एखाद्याशी लग्न करावे अशी त्याची इच्छा होती. चित्रपटसृष्टीत काय होते हे त्याला माहित होते. मी एका व्यावसायिकाशी लग्न करावे अशी त्याची इच्छा होती. त्याने हॉलंडमध्ये माझ्यासाठी एक मुलगा देखील निवडला होता. पण माझे प्रेम खरे होते”.
सुनिता आहुजा पुढे म्हणाली, “बालपणाचे प्रेम असे आहे. आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमच्या नात्याला कोणाची नजर लागली काय माहित. पण मी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही”. सुनीता आहुजा हिने सांगितले की, तिच्या सासूबाईंनी गोविंदाबरोबरच्या लग्नात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबाबत बोलताना सुनीता म्हणाली, “जेव्हा मी गोविंदाशी लग्न केले तेव्हा आम्ही मोठ्या कुटुंबासमवेत राहत होतो, पण मी त्यांच्यावर नेहमीच प्रेम केले. आजही मी माझ्या सासूबाईंमुळे गोविंदाच्या घरी राहत आहे. आम्ही लग्न करावे अशी तिची इच्छा होती. तिने गोविंदाला सांगितले होते, जर तू सुनीताला सोडलंस तर तू भिकारी होशील, त्यांचा हा संवाद मला आजही आठवतो.