सिनेसृष्टीत बरीच अशी कलाकार मंडळी असतात ज्यांना कित्येकदा ट्रोलिंगचा सामना हा करावा लागतो. बरेचदा ही कलाकार मंडळी ट्रोलर्सच्या कमेंटवर सडेतोड उत्तर देतात तर काहीवेळा ते दुर्लक्ष करताना दिसतात. विशेषतः ही कलाकार मंडळी त्यांच्या फोटोशूटमुळे ट्रोल होताना दिसतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ट्रोलर्सच्या उत्तरावर दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईक. (Akshaya Naik Answers To Trollers)
अक्षया नाईक याआधीही बरेचदा ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकली आहे. अभिनेत्री म्हणून तिला या ट्रोलिंगला बरेचदा सामोरे जावे लागले आहे. बरेचदा अभिनेत्रीला बॉडी शेमिंगवरुनही ट्रोल करण्यात आलं. दरम्यान अक्षया अनेकदा तिला न पटणाऱ्या गोष्टींवर बेधडकपणे भाष्य करताना दिसली. तसेच बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सणसणीत उत्तरही दिलेलं आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या पोस्टवर ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी अक्षयाने बोल्ड फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत, “हा फोटो मी माझ्या फोनच्या गॅलरीमधून इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आहे. माझे प्रेक्षक मला या बोल्ड लूकमध्ये स्वीकारतील की नाही याची मला खात्री नाही. कधीही न होण्यापेक्षा उशीरा का होईना मला जाणवले की मी एक कलाकार आहे. आणि जर मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडले नाही तर माझी वाढही खुंटेल” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आणखी वाचा – ‘CID’ फेम अभिनेत्रीला कुटुंबियांकडून मारपीट, जखमी अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली अन्…
दरम्यान काही नेटकऱ्यांनी अक्षयाच्या या पोस्टवर तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने, “‘मालिकेमध्ये खूप साजूक असतात या, इकडे पैसा भेटतो तर काय काय करतात” असं म्हटलं आहे. या पोस्टवर अक्षयाने उत्तर देत, “तुमची विचार करण्याची क्षमता पाहून तुमची दया आली. पैसे मालिका करताना मिळत नाहीत असं वाटतं का तुम्हाला? समोरच्या व्यक्तीला ट्रोल करताना काहीतरी ठोस मुद्दा आणा आणि मग बोला. आणि स्वतःची काळजी घ्या” असं म्हटलं आहे. तर आणखी एका यूझरने लिहिलं आहे की, “कपडे घाल किंवा काढ तुझी मर्जी” नेटकऱ्याच्या या कमेंटवर अक्षयाने उत्तर देत, “पुढच्या वेळेस माझ्या प्रोफाइलवर बकवास कमेंट केल्या तर प्रोफाइल रिपोर्ट करेन” असं म्हणत बोलतीच बंद केली आहे.