रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“धक्कादायक घटना आणि…”, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने शेअर केलेला व्हिडीओ पाहून प्रेक्षक भावुक, म्हणाले, “घरातील कोणीतरी गेल्यासारखं वाटतंय”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 18, 2025 | 11:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jyoti Chandekar Death

"धक्कादायक घटना आणि…", 'स्टार प्रवाह' वाहिनीने शेअर केलेला व्हिडीओ पाहून प्रेक्षक भावुक, म्हणाले, "घरातील कोणीतरी गेल्यासारखं वाटतंय"

Jyoti Chandekar Death : मराठी सिनेसृष्टीत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. ज्योती यांच्या अचानक निधनाच्या बातमीने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला. वयाच्या ६९व्या वर्षी ज्योती यांची प्राणज्योत मालवली. काल १७ ऑगस्ट रोजी त्या अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या अंत्यसंस्काराला कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली दिसली. त्यांच्या जाण्याने चाहते शोक व्यक्त करत आहेत. तर चाहते आणि अनेक सहकलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्योती चांदेकर शेवटच्या ठरलं तर मग या मालिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांना पूर्णा आजी या पात्रामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मालिकेतील या पूर्णा आजी सगळ्यांच्याच आजी झाल्या.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीनेही ज्योती यांना श्रद्धांजली वाहत व्हिडीओ शेअर केला आहे. ‘ज्योती ताई तुम्ही कायम आमच्या आठवणीत राहाल…भावपूर्ण श्रद्धांजली’ असं म्हणत सर्वांच्या लाडक्या पूर्णा आजीला म्हणजेच ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत स्टार प्रवाहने व्हिडीओ शेअर केला आहे. इतकंच नाहीतर ‘स्टार प्रवाह’च्या आणि इतरही कलाकार मंडळींनी ज्योती यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळाली. ‘स्टार प्रवाह’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पूर्णा आजीबरोबरचे खास क्षण पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’च्या सेटवरच बेशुद्ध पडलेल्या आणि…; गेल्यावर्षी आजारपणानंतर केलेलं मालिकेत कमबॅक, आता मात्र आजारपणाशी झुंज अपयशी

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्टार प्रवाहने शेअर केलेला या व्हिडीओ पाहून चाहते भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. चाहत्यांनी या व्हिडीओवर असंख्य कमेंट करत पूर्णा आजींना मिस करणार असल्याचं म्हटलं. ‘पूर्णा आजीशिवाय ठरलं तर मग अपूर्ण’, ‘अशी आज्जी पुन्हा होणे नाही.खरंच पूर्णा आजीकडे बघून असंच वाटायचं की आजी हवी तर अशीच’, ‘खरंच तुम्ही फसवलं इतक्या लवकर जायला नको होतं तुम्ही’, ‘आमचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये’, ‘अतिशय दुःखद आणि अचानक घडलेली धक्कादायक घटना’, ‘खूप वाईट वाटत आहे. आपल्या घरातील कोणी तरी गेल्या सारखं वाटत आहे’, ‘उत्कृष्ट सादरीकरण पूर्णा आजी करायच्या. त्याजागी दुसरं पूर्णा आजीचा रोल केलं तरी त्याचं सारखं कोणीच करणार नाही खूप आठवणीत राहतील पूर्णा आजी’, अशा असंख्य कमेंट करत प्रेक्षक भावुक झाले.

आणखी वाचा – “मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजींच्या ‘त्या’ वाक्याने जुई झालेली सुन्न, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “स्मशानात शांत झोपलेलं बघून…”

यापूर्वी दोन वेळा ज्योती चांदेकर यांची मालिकेच्या शूटिंगदरम्यान प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांनी दोन महिने मालिकेतून ब्रेक घेतला. पण, त्या ब्रेकनंतर ज्योती पुन्हा मालिकेत परतल्या. मात्र, आता त्यांची पुन्हा एकदा प्रकृती बिघडली. आणि त्यांनी आजारपणातच अखेरचा श्वास घेतला. आता ज्योती चांदेकर यांची मालिकेतील कमी कायमच जाणवत राहील.

Tags: Jyoti chandekar deathmarathi actressTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Marathi actor house purchase

जेजुरीत खंडोबाच राहायला येणार! 'जय मल्हार' फेम अभिनेत्याच जेजुरीत होणार हक्काचं घर, भूमिपुजनाचे फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.