गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे…’ नंतर रुपाली भोसलेचं कमबॅक, खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार, तर मुख्य भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 10, 2025 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
lapandav serial promo

'आई कुठे…' नंतर रुपाली भोसलेचं कमबॅक, खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार, तर मुख्य भूमिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री

lapandav serial promo : मालिकाविश्वात सध्या अनेक नव्या मालिका भेटीस येत आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नुकतीच ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. यानंतर आता ‘स्टार प्रवाह’ने नुकतीच आणखी एका नव्याकोऱ्या मालिकेची घोषणा केली आहे. अलीकडेच ‘स्टार प्रवाह’ने दोन नवीन प्रोमो शेअर केले होते. या प्रोमोद्वारे स्टार प्रवाहने लवकरच नवीन मालिका येणार असल्याचं सांगितलं. आणि अखेर मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोने या साऱ्या उत्सुकतेला पूर्णविराम दिला. समोर आलेल्या प्रोमोमध्ये मालिकेतील तीन महत्त्वाची पात्र उघड झाली आहेत. शिवाय मालिकेचे नाव लपंडाव असल्याचंही समोर आलं.

याआधीच्या प्रोमोमध्ये पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीमध्ये असलेली अभिनेत्री समोरुन चालताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ड्रायव्हरची टोपी घालताना एक अभिनेता दिसला. मात्र या दोन्ही कलाकारांचे चेहरे दिसले नाहीत. आता अखेरीस या नव्या मालिकेबद्दल आणि यातल्या कलाकारांबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्टार प्रवाहाने नुकतीच त्यांच्या सोशल मीडियावरुन या नव्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. तसेच या मालिकेचे नाव ‘लपंडाव’ असून या मालिकेच्या प्रोमोमध्ये रुपाली भोसले सरकारच्या भूमिकेत आहे तर चेतन वडनेरे ड्रायव्हरच्या भूमिकेत आहे. या दोघांबरोबर अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिकेत दिसतेय.

आणखी वाचा – चार-पाच तास शस्त्रक्रिया, लघवीची पिशवी हातात अन्…; बॉबी डार्लिंगच्या लिंग बदलाच्या सर्जरीचा थरारक अनुभव, कठीण परिस्थिती आणि…

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

प्रोमोमधून उलगडलेल्या कथेत असं दिसतंय की, कृतिकाचं नाव सखी असून ती तिच्या आईच्या प्रेमाला आसुसलेली आहे. सखीच्या वाढदिवसाला रुपाली भोसले म्हणजेच सरकार तिला हाक मारतात. आणि ही हाक तिला लग्नासाठी मुलांचे फोटो दाखवायला असते. सखीचा वर मीच ठरवणार असं ती म्हणते . शेवटी जाता जाता एका ड्रायव्हरबरोबरच्या संभाषणात ती सखीचं लग्न होणार असं सांगताना दिसते. तर प्रेक्षकांचा या प्रोमोला आणि मालिकेतील कलाकरांना भरभरुन प्रतिसाद मिळतोय.

आणखी वाचा – एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट, ‘प्रेमाची गोष्ट २’ चा टिझर समोर, मोठी स्टारकास्ट पडद्यावर झळकणार

यापूर्वी ही ‘आई कुठे काय करते’ मालिकेत रुपाली भोसलेने संजना ही ग्रे शेड असलेली भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा ती लपंडाव या मालिकेतून उच्च, नामांकित, घरंदाज आणि चेहऱ्यावर बराच माज असलेली सरकार ही भूमिका साकारत आहे. आता रुपालीची ही नवी भूमिका प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडणार आहे हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: lapandav serialmarathi serialrupali bhosale
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Humaira Asghar Death

पोटच्या लेकीची बॉडी घेण्यास वडिलांचा नकार, अभिनेत्रीच्या मृत्यूचं धक्कादायक सत्य, कुजलेलं शव घरात आढळलं आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.