बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनंत-राधिका यांच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांबरोबर फोटो काढणारी ही मुलगी नक्की आहे तरी कोण?, अंबानी कुटुंबाबरोबर काय आहे कनेक्शन?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 15, 2024 | 5:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
South Superstar Mahesh Babu's daughter Sitara pictures with many celebs at the wedding of Anant Ambani and Radhika Merchant.

अनंत-राधिका यांच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांबरोबर फोटो काढणारी ही मुलगी नक्की आहे तरी कोण?, अंबानी कुटुंबाबरोबर काय आहे कनेक्शन?

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे लग्न पार पडले. शुक्रवारी १२ जुलै रोजी त्यांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. या विवाह सोहळ्यासाठी केला गेलेला थाटमाट हा फारच नेत्र दीपक होता. या सोहळ्यात केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातील मोठमोठ्या दिग्गज व्यक्तींनीसुद्धा उपस्थिती लावली होती. केवळ सिनेसृष्टीतीलच नव्हे तर अनेक देशाविदेशातील राजकीय मंडळीसुद्धा या शाही विवाह सोहळ्यात उपस्थित होते. या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये एका ११ वर्षांच्या मुलीने सर्वांचे लक्ष वेधले.

अंबानीच्या लग्नात आलेल्या प्रत्येक पाहुण्याबरोबर या मुलीने फोटो काढले असून तिने तिच्या सोशल मीडियावर हे फोटो पोस्टही केले आहेत. हेच फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून दाक्षिणात्य अभिनेती महेश बाबू यांची मुलगी आहे, महेश बाबू यांनी पत्नी नम्रता शिरोडकरबरोबर आली होती. तेव्हा त्यांची मुलगी सिताराही सहभागी झाली होती. सिताराने अंबानीच्या लग्नातील सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराबरोबर हटके पोज देत फोटो काढले.

View this post on Instagram

A post shared by sitara (@sitaraghattamaneni)

आणखी वाचा – क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयकडून १ कोटीची मदत जाहीर होताच ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले, “तंत्रज्ञ कलावंतांसाठी…”

सिताराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हे फोटो पोस्ट केले असून यामध्ये बॉलिवूडच्या रणवीर सिंहपासून हॉलिवूडच्या कीम कर्दिशीयनपर्यंत आणि रेखापासून ते कियारा अशा अनेक कलाकारांचा सहभाग आहे. सिताराने शेअर केलेले हे पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेकजण तिच्या या फोटोबद्दल तिचे कौतुक करत आहेत. इतर स्टारकिड्सपेक्षा सिताराने शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.    

आणखी वाचा – कॅन्सरमुळे आईचे निधन, नंतर कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे बाबा गेले, ‘फुलाला सुगंध…’ फेम अभिनेत्यावर ओढवला होता दु:खद प्रसंग, म्हणाला, “आई गेल्यानंतर…”

दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची मुलगी सितारा ही केवळ ११ वर्षांची आहे. केवळ महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी म्हणून ओळखली जात नाही तर ती एक उत्तम डान्सरही आहे. तिने अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सिताराचे स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट असून १ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सिताराने इतक्या लहान वयात तिच्या वडिलांप्रमाणे प्रसिद्धी मिळवली आहे.

Tags: Anant Ambani Radhika Merchant Marriageentertainment newsMahesh Babu DaughterSitara
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Actress Kranti Redkar shared a video of her visiting Kolhapur's Ambabai with her husband Sameer Wankhede.

Video : क्रांती रेडकरने पतीसह घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, अभिनेत्रीच्या संस्कारांचं होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.