गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान, शाहरुखनंतर आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, सिनेविश्वात मोठी खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 10, 2024 | 2:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
South actor and Deputy Chief Minister of Andhra Pradesh Pawan Kalyan received death threats and insults through a phone call.

सलमान, शाहरुखनंतर आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर अभिनेत्याच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली. यानंतर शाहरुख खानलादेखील धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर आता आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दाक्षिणात्य विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि आंद्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पवन कल्याण यांना धमकीचा फोन आला आहे. जिथे दादागिरी करत शिवीगाळ करत उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. (Pawan Kalyan received death threats)

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोमवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणारा एक मॅसेज आणि कॉल आला होता, जिथे अपशब्द वापरले आणि धमकीचा मेसेजदेखील पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. पवन कल्याण यांच्या जनसेवा पार्टीच्या ट्विटर हँडलवरूनही एक पोस्ट करण्यात आली.

Deputy Chief Minister Pawan Kalyan's office staff received threatening calls from Agantakudi. A bystander who warned that he would be killed. In that order, he sent messages warning with offensive language. Peshi staff brought the threatening calls and messages to the attention… https://t.co/QjsI9hwUj5 pic.twitter.com/gR7hLsbaRl

— ANI (@ANI) December 9, 2024

आणखी वाचा – डेकोरेशन, सरप्राईज अन्…; ‘असा’ साजरा झाला ऐश्वर्या नारकरांचा पन्नासावा वाढदिवस, तितीक्षानी शेअर केला खास व्हिडीओ

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा फोन आला की, त्यांना मारून टाकलं जाईल. यानंतर शिवीगाळ करणारे अनेक मॅसेजही आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी या बातमीने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. तसंच चाहतेही चिंतेत पडले आहेत. धमकी देण्यामागे नक्की कोणता हेतू असेल? याबाबत देखील काही कळू शकलेलं नाही. शिवाय पोलिसांनी देखील प्रकरणावर अद्याप मौन बाळगलं आहे.

आणखी वाचा – अभिषेक-ऐश्वर्या दुसऱ्या अपत्याच्या विचारात?, रितेश देशमुखच्या कार्यक्रमात अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “आराध्यानंतर…”

दरम्यान, पवन कल्याण यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. साउथ इंडस्ट्रीतील ते एक प्रसिद्ध नाव आहे. पवन कल्याणचा शेवटचा चित्रपट ‘ब्रो’ होता. अभिनेत्याने १९९६ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते २००८ मध्ये राजकारणात आले. पवन कल्याण त्याच्या परोपकारी कार्यामुळे देखील चर्चेत असतो. देशाच्या कठीण काळात त्यांनी लाखो, करोडो रुपयांची देणगी दिली आहे.

Tags: pawan kalyanPawan Kalyan received death threatsthreat to pawan kalyan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
annu kapoor on amitabh bachachan

भर कार्यक्रमात अन्नू कपूर यांनी धुतले महिलांचे पाय, अमिताभ बच्चन यांनाही टोकलं, म्हणाले, “जया बच्चन...”  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.