शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्यावर पाकमध्ये हल्ला झाला, पण पाकिस्तानने मला वाचवलं”, कराची बॉम्बस्फोटादरम्यान थोडक्यात बचावलेला सुप्रसिद्ध गायक, म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 31, 2026 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sonu nigam karachi concert

"माझ्यावर पाकमध्ये हल्ला झाला, पण पाकिस्तानने मला वाचवलं", कराची बॉम्बस्फोटादरम्यान थोडक्यात बचावलेला सुप्रसिद्ध गायक, म्हणाला…

sonu nigam karachi concert : गायक सोनू निगम आजही २००४ मध्ये कराचीमध्ये झालेला बॉम्बस्फोट विसरलेला नाही, ज्यामध्ये तो थोडक्यात बचावला होता. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आणि त्या हल्ल्याच्या आठवणी सोनू निगमच्या मनात आजही ताज्या आहेत. कराचीतील हा बॉम्बस्फोट १० एप्रिल २००४ रोजी झाला होता. सोनू निगमने त्या बॉम्बस्फोटाची एक रील इंस्टाग्रामवर शेअर केली आहे, ज्यामध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीने सोनू निगमला वाचवण्यात कशी मदत केली हे सांगितले आहे. सोनू निगम ज्या ठिकाणी परफॉर्म करणार होता, त्याच्या परफॉर्मन्सच्या काही तास आधी बॉम्बस्फोट झाला. कराची बॉम्बस्फोटाचा व्हिडीओ एका पाकिस्तानी चाहत्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये सोनू निगमच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल सांगण्यात आले आहे. सोनू निगमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा व्हिडीओ रिशेअर केला आहे. सोनू निगमचा शो सुरु होण्याच्या काही तासांपूर्वी, स्थळाजवळ एक स्फोट झाला, ज्यामध्ये बरेच नुकसान आणि जीवितहानी झाली, परंतु तरीही कडक सुरक्षेमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती, हे त्यात सांगण्यात आले आहे.

व्हिडीओमध्ये २०२५ मध्ये मरण पावलेल्या कॉन्सर्ट आयोजक फुरकान टी. सिद्दीकी यांची मुलाखत देखील आहे. बॉम्बस्फोटानंतर वातावरण किती गंभीर झाले होते, सुरक्षा वाढवण्यात आली होती आणि सोनू निगम आणि पाकिस्तानी रेंजर्सला कडेकोट सुरक्षेत कार्यक्रमस्थळी नेण्यात आले होते. स्फोट होऊनही सोनू निगमने मोठे धाडस दाखवत स्टेजवर जाऊन परफॉर्म केले. परफॉर्मन्सपूर्वी सोनू निगमने पाकिस्तानी लोकांना सांगितले होते, “मी तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. आज संध्याकाळ आहे, तुम्ही घाईत आहात का? भारत आणि पाकिस्तानचे लोक खूप दुर्दैवी आहेत, ज्यांना इतकी वर्षे प्रेमाची उणीव भासत होती… मग ते भारत असो की पाकिस्तान, आमचे प्रेम असेच वाढत राहो हीच प्रार्थना”.

आणखी वाचा – … म्हणून निर्मिती सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी मकरंद अनासपुरेंची घेतली मदत, म्हणाल्या, “भाषेचा आणि…”

View this post on Instagram

A post shared by Arsalan Khan (@arsalan.khan8888)

व्हिडीओमध्ये फुरकान सिद्दीकी म्हणत होते की, “स्फोट झाला तेव्हा माझी कार पुढे होती. आम्ही पार केल, बस पार केली. अगदी मागच्या बाजूला स्फोट झाला. सर्वजण पांगल्यावर लोक पुढे धावले, मैदान समोर होते आणि ठिकाण उजव्या बाजूला होते. आम्ही पुढे मैदानाच्या कोपऱ्यात थांबलो आणि बस थेट जमिनीवर गेली. लोकांनी जमिनीवर जाऊन सुरक्षारक्षकांना मदतीसाठी बोलावले. तोपर्यंत पोलिसांनी तेथे येऊन त्यांना घेराव घातला. त्याच व्हिडीओमध्ये फुरकानने एका ठिकाणी सांगितले की कराची बॉम्बस्फोटाच्या घटनेने त्याला आणि सोनू निगमला कसे जवळ केले आणि त्यांच्यात कायमचे मजबूत बंध निर्माण झाले. फुरकान म्हणाले होते की, ‘दर १० एप्रिलला संदेश येतो की आपण भाऊ आहोत. मृत्यूच्या जबड्यातून वाचवले’. यामध्ये फुरकानने सोनू निगमच्या त्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे ज्यात गायकाने त्याला सांगितले होते की, “येथे माझ्यावर हल्ला झाला होता… पण पाकिस्तानींनीच मला वाचवले”.

Tags: pakistan attackpakistan bombblastsonu nigam
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Alka Yagnik hearing problem

दोन वर्षांपासून सुप्रसिद्ध गायिकेचा आवाज ऐकलाच नाही, 'या' गंभीर आजाराने आहे त्रस्त, ऐकूच येत नाही आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.