सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतेच २३ जून २०२४ रोजी झहीर इक्बालबरोबर विवाह केला. मित्र व कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा नोंदणीकृत विवाह झाला. दोघांनी सात वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे सोनाक्षी सिन्हाला ट्रोलही केले जात आहे. या आंतरधर्मीय जोडप्याने धार्मिक विधींपेक्षा कायद्यानुसार नोंदणी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते.
सोनाक्षी व झहीर यांचे लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या या व्हायरल फोटोवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सोनाक्षी भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनाक्षीचे लग्नानंतरचे विधी पार पडत असताना ती भावुक झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
सोनाक्षी सिन्हाचा हा व्हिडिओ झहीर इक्बालची जवळची बहीण जन्नत वासीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जन्नत तिचा भाऊ झहीर आणि भावजय सोनाक्षीची नजर काढताना दिसत आहे. भावजयचे हे प्रेम पाहून सोनाक्षी सिन्हा खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तिला तिच्या भावजयचे हे प्रेम अश्रु अनावर झाले असून ती हे अश्रु पुसतानाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सोनाक्षी सिन्हाचा लग्नात अत्यंत जबरदस्त असा लूक होता. सोनाक्षीने लग्नात अत्यंत खास अशी साडी नेसली होती. तिने ४४ वर्षांपूर्वीची साडी घातली होती आणि ती साडी तिच्या आईची आहे. विशेष म्हणजे ही साडी सोनाक्षी सिन्हाच्या आईने त्यांच्या लग्नात ती साडी नेसली होती. तर झहीर पांढऱ्या रंगाच्या चिकनकारी कुर्त्यामध्ये दिसला. दोघांचा हा लूक एकदम रॉयल दिसत होता.
लग्नानंतर दोघांनी शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये ग्रँड रिसेप्शनही आयोजित केले होते. यामध्ये सलमान खान, काजोल, राजकुमार राव, रेखा, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभाग घेतला होता.