अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. २३ जून रोजी अभिनेता झहीर इक्बालबरोबर सोनाक्षीचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. सोनाक्षी सिन्हाच्या घरीच त्यांचा नोंदणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. यावेळी दोन्ही कुटुंबातील कुटुंबीय, नातेवाईक उपस्थित होते. लग्नानंतर त्यांनी रात्री रिसेप्शनचेही आयोजन केले होते आणि यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दोन दिवसांपासून सोनाक्षी व झहीरच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आलेले पाहायला मिळाली. (sonakshi sinha and zaheer iqbal wedding)
अशातच आता त्यांच्या लग्नातील समोर आलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचे धर्म वेगळे असल्याने त्यांनी मध्यममार्गाचा अवलंब करत नोंदणी पद्धतीने लग्नाला पसंती दिली. सुरुवातीला वडील शत्रुघ्न आणि आई पूनम सिन्हा हे लेकीच्या या निर्णयावर नाराज होते. पण नंतर सर्वकाही सुरळीत झाले. सर्व विधी अगदी उत्तमरीत्या पार पडले. रिसेप्शनमध्ये सोनाक्षी सिन्हा लाल साडी, हातात चुडा आणि केसात सिंदूर अशा नववधूच्या लूकमध्ये दिसली.
सोनाक्षीच्या कन्यादानाचा फोटोही समोर आला आहे. या फोटोत, शत्रुघ्न व पूनम सिन्हा यांचा हात सोनाक्षी व झहीरच्या हातावर ठेवण्यात आला आहे, हा क्षण कन्यादान विधीच्या वेळचा आहे. लग्नाच्या एक दिवस आधी त्यांच्या घरी पूजेचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र, या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, “त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते ना?”.
तर आणखी एक म्हणाला की, “आई-वडिलांसाठी हा सर्वात दुःखाचा क्षण आहे”. एकजण म्हणाला, “कन्यादान हिंदू संस्कृतीत आहे. आता काय बोलायचे राहिले आहे?”. तर आणखी एकाने म्हटलं, “या लोकांचे सगळे विधी उलटे का?”, “आता या सर्व विधींना काय अर्थ आहे, जेव्हा हिंदू परंपरेनुसार लग्न केले जात नाही तेव्हा बाकीच्या विधींना काही अर्थ नाही. तुम्ही ना पायाची पूजा केली ना सिंदूर दान केले”, असं म्हटलं आहे.