बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२१व्या वर्षी गरोदर होती शाहिद कपूरची पत्नी, गर्भपाताची वेळ पण…; स्वतःच सांगितला प्रसंग, म्हणाली, “सोनोग्राफी करुन…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 25, 2024 | 4:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mira Rajput Miscarriage

२१व्या वर्षी गरोदर होती शाहिद कपूरची पत्नी, गर्भपाताची वेळ पण...; स्वतःच सांगितला प्रसंग, म्हणाली, "सोनोग्राफी करुन..."

बॉलिवूडमधील रोमँटिक कपल म्हणून शाहिद कपूर व मीरा राजपूत यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. मीरा व शाहिद यांनी २०१५ साली लग्न केले. त्यानंतर २०१७ मध्ये, या जोडप्याने मुलगी मीशा हिचे पहिले अपत्य म्हणून स्वागत केले. मुलीच्या जन्माच्या सात वर्षांनंतर मीराने तिच्या पहिल्या गरोदरपणाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, जेव्हा ती २१व्या वर्षी गरोदर राहिली तेव्हा तिचा जवळजवळ ‘गर्भपात’ झाला होता. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने खुलासा केला की, जेव्हा ती पहिल्या मुलाची अपेक्षा करत होती तेव्हा तिचा गर्भपात झाला. मीराने सांगितले की, जेव्हा ती चार महिन्यांची गरोदर होती, तेव्हा तिच्या गर्भाशयाचा इतका विस्तार झाला होता की सोनोग्राम पाहून तिचे डॉक्टर काळजीत पडले आणि गर्भपात होऊ नये म्हणून तिला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. तिने अडीच महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्याचेही सूचित केले. (Mira Rajput Miscarriage)

मीरा तिच्या पहिल्या गरोदरपणात फक्त २१ वर्षांची होती. मीराने प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टवर तिच्या पहिल्या गरोदरपणातील अडचणी आणि तिचे पहिले मूल कसे गमावले याबद्दल सांगितले. याबाबत बोलताना मीरा म्हणाली, “अनेकांना हे माहीत नाही, पण जेव्हा मी पहिल्यांदा गरोदर होते, तेव्हा ती माझी पहिली गर्भधारणा होती. त्यावेळी मी २१-२० वर्षांची होते. असं असलं तरी, मी निरोगी होते आणि मी खूप तंदुरुस्त होते. मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळी मुलांना जन्म देत होते. यापेक्षा वाईट काय असू शकते की मी चार महिन्यांची गरोदर असताना माझा गर्भपात होणार होता. त्यानंतर मी सोनोग्राफी करुन घेतली आणि डॉक्टरांनी मला आराम करण्यास सांगितले.

आणखी वाचा – सई लोकूरच्या लेकीचा अन्नप्राशन सोहळा, परंपरा जपत सेलिब्रेट करत आहे प्रत्येक क्षण, घरातील सजावटीने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

सोनोग्राफीचा दिवस आठवत मीरा म्हणाली की, डॉक्टर व शाहिदच्या चेहऱ्यावर काळजी होती. ती म्हणाली, “सामान्यपणे, जेव्हा जोडपी सोनोग्राफीसाठी जातात आणि परत येतात आणि ते एकमेकांशी बोलतात. पण माझ्या बाबतीत सर्वकाही वेगळे होते. शाहिद मला म्हणाला, “मला तुझ्याशी बोलायचं आहे पण तू बसू शकत नाहीस”. कृपया झोप असा सल्ला त्याने मला दिला. माझं पोट खूप पसरलं होतं आणि मी चार महिन्यांची गरोदर होते. त्यावेळी शाहिद म्हणाला, “तु तुझं बाळ कधीही गमावू शकतेस”.

आणखी वाचा – “यापुढे एक खुर्ची कायमची रिकामी…”, चाहतीच्या निधनानंतर सुबोध भावेला दुःख अनावर, म्हणाला, “इरावती तुम्हाला…”

मीराने पुढे सांगितले की, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अडीच महिने निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. याचा तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि हे शाहिदच्या लक्षात आला. मीरा म्हणाली, “अडीच महिन्यांनंतर, मला तिथून बाहेर पडायचे होते, पण अंथरुणातून मी उठू शकत नव्हते. माझी ही अवस्था पाहून शाहिद माझ्या डॉक्टरांशी बोलला. आणि त्याने सांगितले की, “मी घराला हॉस्पिटलमध्ये बदलेन, सेट करेन. एक पलंग आणि सर्व काही आवश्यक वस्तू मी घेईन. मी सर्व ठीक करेन, पण मीराला घरी राहू देत”. मात्र, मीराने पुढे असेही सांगितले की, घरी आल्यानंतर तिला पुन्हा अडचणींचा सामना करावा लागला. पण नंतर सर्व काही ठीक झाले. अखेर मीराने २६ ऑगस्ट २०१७ रोजी मीशाचे स्वागत केले.

Tags: entertainmentmira rajputmira rajput and shahid kapoorMira Rajput Miscarriage
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Sonakshi Sinha getting emotional during the post-wedding rituals video viral on social media

Video : नणंदेने काढली सोनाक्षी सिन्हाची नजर, अभिनेत्रीला कोसळलं रडू, एकमेकींना मिठी मारली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.