सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल अखेर सात सात वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्नबंधनात अडकले आहेत. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. झहीर व सोनाक्षी आता अधिकृतपणे पती-पत्नी आहेत. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी झहीरच्या वडिलांनी सोनाक्षी इस्लाम धर्म स्वीकारणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. (sonakshi sinha and zaheer iqbal wedding photo)
सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालबरोबरच्या लग्नातील पहिला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने असे लिहिले आहे की, “आजच्याच दिवशी, सात वर्षांपूर्वी (२३.०६.२०१७) एकमेकांच्या डोळ्यात, आम्ही एकमेकांसाठी प्रेम पाहिले आणि ते धरुन ठेवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमाने आम्हाला सर्व आव्हाने पार करत जिंकण्याचे मार्गदर्शन केले आहे. आणि या आनंद पसरवणाऱ्या क्षणापर्यंत पोहोचवले आहे. आम्ही आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवतांच्या आशीर्वादाने पती-पत्नी आहोत”.
अगदी साधेपणाने सोनाली व झहीरने हे लग्न केलं आहे. अवाढव्य खर्च करणाऱ्या पेहरावाला पसंती न देता त्यांनी अत्यंत साधा लूक यावेळी केला होता. सोनालीने यावेळी पांढऱ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती, तर झहीरने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. कोर्ट मॅरेज पद्धतीने दोघांनी लग्न केल्यानंतर झहीरने सोनालीच्या हातावर किसही केलेलं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. लग्नावेळी सोनालीचे वडील शत्रुघ्न सिन्हाही खूप आनंदी असल्याचे दिसले.
सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा, जे लेकीच्या अचानक लग्नाच्या योजनांमुळे नाराज झाले होते. ते देखील पत्नी पूनम सिन्हाबरोबर या सोहळ्याला उपस्थित होते. आता हे जोडपे त्यांच्या मित्रपरिवारासह लग्न एन्जॉय करायला सज्ज झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंग आणि दिलजीत दोसांझ यांच्यासह अनेकजण या खास लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.