रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकणाऱ्या वडापाव गर्लची एका दिवसाची इतकी आहे कमाई, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये केला खुलासा, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 23, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Know about vadapav girl income

दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकणाऱ्या वडापाव गर्लची एका दिवसाची इतकी आहे कमाई, 'बिग बॉस ओटीटी'मध्ये केला खुलासा, म्हणाली…

‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ला सुरुवात झाली असून तब्बल १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर शौरी ते रॅपर नेझी आणि यूट्यूब, सोशल मीडियाच्या जगातील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. या चेहऱ्यांमध्ये दिल्लीची ‘वडा पाव गर्ल’ चंद्रिका दीक्षितचेही नाव आहे. ‘बिग बॉस’ या शोमध्ये येताच तिने खुलासा केला की, ती दररोज ४० हजार रुपये कमावते. दरम्यान तिची मासिक कमाई १२ लाख रुपये आहे. वडापाव गर्लच्या या वक्तव्याची खूप चर्चा होत असून तिच्या कमाईचा आकडा जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Know about vadapav girl income)

चंद्रिका दीक्षितने पती व मुलाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी सोडली आणि वडापाव विकण्यासाठी रस्त्यावर स्टॉल लावण्याचे ठरवले कारण तिला स्वयंपाकाची कला अवगत आहे. जेव्हा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले तेव्हा लोकांच्या रांगा लागल्या. मात्र, तिच्या वडापावशी संबंधित वादांमुळे ती चर्चेत राहिली आणि तिच्यावर अनेक प्रकारचे आरोपही झाले. आता ती ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये सहभागी झाली आहे. आणि तिने येताच तिच्या कमाईबद्दल केलेल्या विधानाने सह-स्पर्धकांनाही धक्का बसला.

आणखी वाचा – लग्नानंतर सासरवाडीत रमला प्रथमेश परब, निसर्गाच्या सान्निध्यात बायकोबरोबर बाईक राईडचा आनंदही लुटतोय अन्…; व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Chandrika Gera (@chandrika.dixit)

‘बिग बॉस’च्या घराच्या बागेत वडा पाव गर्ल बसली होती. त्यावेळी सह-स्पर्धकही तिथे होते. यादरम्यान तिने दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकून दररोज ४० हजार रुपये कमावल्याचे उघड केले. चंद्रिकाने द्वेष करणाऱ्यांना उत्तर देत करत म्हटले की, “मी दररोज ४० हजार रुपये कमावते हे काहींना आवडत नाही. अरे मित्रा, मी खूप मेहनत करत आहे. तुम्ही पण करा. नेटफ्लिक्स वापरु नका, फोनवर राहू नका, बाहेर पडा, वडिलांचे पैसे सोडा”, असा सल्ला तिने दिला. चंद्रिकाच्या कमाईबद्दल ऐकून शिवानी कुमारीला धक्का बसला.

आणखी वाचा – काका-पुतणीची जुगलबंदी! जुई गडकरीने शेअर केला खास मैफिलीचा व्हिडीओ, कुटुंबासह एन्जॉय करताना दिसली अन्…

अनिल कपूर हा सीझन होस्ट करत आहे. चंद्रिका दीक्षित व्यतिरिक्त, कलाकारांमध्ये रणवीर शौरी, शिवानी कुमारी, सना सुलतान, सना मकबूल, विशाल पांडे, लव कटारिया, दीपक चौरसिया, सई केतन राव, मुनिषा खटवानी, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक, नीरज गोयत, रॅपर नाईज यांचा समावेश आहे.

Tags: Bigg Boss OTT 3chandrika dixit incomeKnow about vadapav girl incomevadapav girl
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
sonakshi sinha and zaheer iqbal wedding photo

ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचा विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.