शुक्रवार, ऑगस्ट 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोहम बांदेकर पाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो व्हायरल, उत्सुकता वाढली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 2, 2025 | 11:07 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
nimish kulkarni getting married

सोहम बांदेकर पाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो व्हायरल, उत्सुकता वाढली

nimish kulkarni getting married : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कोमल कुंभार, अनुष्का पिंपुटकर, मेघन जाधव, स्वानंद केतकर ही कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली. तर ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणही लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नाची धामधूम तुफान व्हायरल झाली. तर अनेक कलाकार मंडळी काही दिवसांतच लग्नबंधनात अडकणार आहेत. येत्या काही दिवसांतच आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर हा देखील पूजा बिरारीसह लग्नबंधनात अडकणार आहे.

काल सोशल मीडियावर पूजा व सोहमच्या हळदीची, संगीतची धामधूम पाहायला मिळाली. आज २ डिसेंबरला ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच आता आणखी एक मराठी अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निमिष कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याची लगीनघाई सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्याच्या घरी त्याच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आणि त्याच्या लग्नापुर्वीच्या विधींचे फोटो समोर आले आहेत.

आणखी वाचा – Video : आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकरच्या लेकाच्या हळदीत मराठी कलाकारांचा तुफान राडा, जबरदस्त डान्स अन्…; व्हिडीओ व्हायरल

डोक्यावर मुंडावळ्या बांधून विधी करतानाचा निमिषचा फोटो समोर आला आहे. यांत त्याने गुलाबी रंगाचे धोतर आणि शेला परिधान केला आहे. नवऱ्या मुलाच्या रूपात तो खूप राजबिंडा दिसत आहे. निमिषच्या मित्राने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि येत्या चार दिवसांत त्यांचं लग्न होणार असल्याची बातमी दिली. निमिष अभिनेत्री कोमल भास्कर हिच्याशी लग्न करणार आहे.

आणखी वाचा – चव्हाणांच्या घरी रमली नवी सूनबाई, लग्नानंतर सूरज चव्हाणचा सुखी संसार, बायकोबरोबर लग्नानंतरचे खेळ खेळण्यात दंग

निमिषने थेट फोटो शेअर करत साखरपुडा केला असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. २५ जुलै २०२५ रोजी निमिषने त्याच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. निमिष कुलकर्णीने कोमल भास्करसह साखरपुडा समारंभ उरकला. अभिनेत्याच्या साखरपुड्याचे अचानक समोर आलेले फोटो पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. आता येत्या चार दिवसांत निमिष व कोमल लग्नबंधनात अडकणार आहेत.

Tags: marathi actorNimish Kulkarniwedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
aadesh and suchitra bandekar dance video

लेकाच्या संगीत सोहळ्यात भाव खाऊन गेले आदेश व सुचित्रा बांदेकर, शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकले, व्हिडीओ पाहताच चर्चेला उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.