सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता वालावलकरने पार पाडली सूनेची जबाबदारी, माहेरनंतर सासरच्या गणपतीच्या सेवेत रुजू, म्हणाली, “आयुष्यभर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 28, 2025 | 4:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita walawalkar ganesh festival

अंकिता वालावलकरने पार पाडली सूनेची जबाबदारी, माहेरनंतर सासरच्या गणपतीच्या सेवेत रुजू, म्हणाली, "आयुष्यभर..."

ankita walawalkar ganesh festival : कोकणात गणेशोत्सव म्हणजे धुमधडाकाच. कोकणातील गणेशोत्सवाला जाण्यासाठी सगळेच नेहमीच उत्सुक असतात. बऱ्याच आधीपासून त्यांची जय्यत तयारीही सुरु झालेली असते. अनेक कलाकार मंडळीही गणेशोत्सवासाठी गावाकडे जाताना दिसतात. कोकणचा गणेशोत्सव म्हटलं की एक नाव आवर्जून येत ते म्हणजे अंकिता वालावलकर. ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर कोकणातील गोष्टी सांगत नेहमीच चर्चेत असते. तिचे मालवणी भाषेतील संवाद नेहमीच साऱ्यांच्या पसंतीस पडतात. अशातच आता कोकणात गणेशोत्सवासाठी अंकिता वालावलकर पोहोचली असल्याचं पाहायला मिळालं.

काल अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती नवऱ्यासह म्हणजेच कुणाल भगतसह सासरची म्हणजेच अलिबाग येथे गणेशोत्सवाची तयारी करत तिने माहेर म्हणजेच मालवण गाठलं. लग्नापूर्वीच अंकिताने कुणालला माहेरच्या गणपतीला दरवर्षी जायचं अशी अट घातली होती. आणि त्यानुसार कुणालनेही अंकिताला दिलेला शब्द पाळला. त्याने जावयाचे कर्तव्य पूर्ण केले. त्यानंतर अंकिता व कुणाल यांनी मालवणहुन त्यांचा दौरा अलिबागच्या दिशेने वळविला. आणि सूनेचं कर्त्यव्य अंकिताने पूर्ण केलं.

आणखी वाचा – “पुन्हा येतील का असे दिवस?”, ‘आई कुठे…’ फेम अभिनेता रमलाय गणेशोत्सवातील बालपणीच्या आठवणीत, म्हणाला, “कोण श्रेष्ठ…”

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

याचा व्हिडीओ अंकिताने शेअर केला आहे. आणि तिने म्हटलं आहे, “माहेरचा गणपती करुन आम्ही निघालोय आता घरी अलिबागला. माहेरचा गणपती म्हणजे जन्मापासून जो आपल्या डोळ्यांसमोर आहे, लहानपणापासून ज्याच्या आरतीत, गोंधळात आपण वाढलो. त्या आठवणी, ती ऊब, ती जबाबदारी म्हणजे माहेरचा गणपती. आणि सासरचा गणपती? तो फक्त देव नसतो, तर तो आपलं नवीन आयुष्य, नवीन घर आणि नवीन नात्यांचा धागा बनतो. माहेरच्या आठवणींना सोबत घेत आपण जेव्हा सासरच्या गणपतीकडे जातो, तेव्हा खरं तर आपल्याला दोन घरांचा आशीर्वाद मिळतो”.

आणखी वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवाला वैष्णवी कल्याणकरने गाठलं सासर, उकडीचे मोदकही बनवले; फोटो पाहताच साधेपणाचं कौतुक

पुढे ती म्हणाली, “एक घर आपल्याला जन्म देणारं, आणि दुसरं घर आपल्याला स्वीकारणारं. म्हणूनच माहेरचा गणपती ही जबाबदारी असते, तर सासरचा गणपती हे नात्यांचं समाधान आणि पूर्णत्व असतं. आणि मी हे दोन्ही आयुष्यभर सांभाळेन”. अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी याला पसंती दर्शविली आहे. आणि अंकिताचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

Tags: ankita walawalkarankita walawalkar ganesh festivalganeshotsav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
ganesh visarjan 2025

Ganesh Visarjan 2025 : गणेश विसर्जन का करतात?, महाभारताशी याचा नेमका संबंध काय?, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.