शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडला हनी सिंग, गर्लफ्रेंडचं नावंही आलं समोर, नक्की कोण आहे ‘ती’ मुलगी?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 11, 2024 | 5:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Yo Yo Honey Singh is in love

घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडला हनी सिंग, गर्लफ्रेंडचं नावंही आलं समोर, नक्की कोण आहे 'ती' मुलगी?

भारतीय रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग त्याच्या गाण्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. यो यो हनी सिंग घटस्फोटानंतर त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर आता गायकाचे नाव टीना थडानीशी जोडले गेले आणि त्यानंतर २०२३ मध्येच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या कानावर आल्या. यानंतर आता गायकाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं असल्याचं समोर आलं आहे. हनी सिंग सध्या अभिनेत्री हीरा सोहलला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत होळीच्या वेळी त्याच्या कॉन्सर्टमध्येही हिरा दिसली होती. पंजाबी अभिनेत्री हीरा ‘थँक गॉड’ चित्रपटामध्ये दिसली आहे. (Yo Yo Honey Singh is in love)

अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला मलायकाची कॉपी असे म्हटले आहे. २०२२ मध्ये हनीने शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतला. यानंतर आता एका सूत्राने हनी सिंगच्या नवीन नात्याची पुष्टी केली आहे. एका नवीन अल्बमबद्दल बोलताना हनीने त्याच्या ब्रेकअपचे संकेतही दिले आहेत. टीना थडानीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर गायक-रॅपर यो यो हनी सिंगचे मन पुन्हा एका सुंदर महिलेवर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा गायक अभिनेत्री हीरा सोहलला डेट करत आहे आणि ही जोडी सार्वजनिक ठिकाणी बरेचदा एकत्र स्पॉटही होताना दिसली आहे.

आणखी वाचा – १० लाख, सामान, पासपोर्ट चोरांनी लुटलं अन्…; नवऱ्यासह परदेशातच अडकली दिव्यांका त्रिपाठी, सतत मदत मागत आहे आणि…

View this post on Instagram

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा हनी सिंगने मुंबईत होळीसाठी आपला परफॉर्मन्स दिला होता (जो त्याचा खूप दिवसांनंतरचा पहिला परफॉर्मन्स होता) तेव्हा हीराही त्या कॉन्सर्टमध्ये उपस्थित होती. एका जवळच्या सूत्राने सांगितले की, “जवळपास एक वर्षापासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही गेल्या महिन्यात रोमँटिक ट्रिपसाठी बाहेरही गेले होते. असे सांगितले जात आहे की, हनी त्याच्या नात्याबद्दल खूप मोकळा आहे आणि तो अनेकदा आपल्या पार्टनरबरोबर दिसतो.

आणखी वाचा – पुन्हा प्रेमाने संसार थाटण्यासाठी अप्पी विचारणार, पण अर्जुनचा थेट नकार, नात्यात कटूता येणार?

मात्र, सध्या त्यांना त्यांचे नाते जगापासून लपवायचे आहे. हीरा ही पंजाबमधील एक अभिनेत्री आहे, जी पंजाबमधील अनेक म्युझिक व्हिडीओ, हिंदी वेबसीरिजचा भाग आहे आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर ‘थँक गॉड’मध्येही ती दिसली.

Tags: bollywood gossiphira sohalyo yo honey singhYo Yo Honey Singh is in love
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
ashok saraf son was attacked while in paris

निवेदिता सराफ यांच्या लेकावर पॅरिसमध्ये झालेला हल्ला, अशोक सराफ यांनी सांगितलेला 'तो' प्रसंग, म्हणालेले, "एक हल्ला आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.