Rahul Vaidya On Virat Kohli : गायक राहुल वैद्य सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. सध्या राहुल त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. राहुल वैद्यने विराट कोहलीबाबत केलेलं भाष्य साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. विराट कोहलीने राहुलला ब्लॉक केले असल्यावरुन हा मुद्दा वाढत गेला. यावरुन त्याने विराटवर उपरोधिक टिप्पणीसुद्धा केली. शिवाय पापाराझींसमोरही तो विराटला बरंच काही बोलला आणि विराटच्या चाहत्यांनाही मूर्ख म्हणाला. या सर्व ड्रामानंतर अखेर विराटने त्याला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केलं आहे. यावरही राहुलने आता पोस्ट शेअर करत विराटचे आभार मानले आहेत.
विराटने अनब्लॉक करताच राहुलने त्याचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. यांत त्याने असं म्हटलं की, “मला अनब्लॉक करण्यासाठी विराट कोहली तुझे आभार. क्रिकेटमधील तू सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेस आणि भारताला तुझ्यावर गर्व आहेस. जय हिंद. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांवर सदैव देवाचा आशीर्वाद राहो”, अशा आशयाची पोस्ट राहुलने लिहिली आहे.
आणखी वाचा – दीपिका कक्करला मोठा आजार, पोटात ट्युमर अन्…; रुग्णालयात अशा परिस्थितीत आहे अभिनेत्री, व्हिडीओ समोर
त्यापुढे आणखी एक पोस्ट शेअर करत, “ज्या बालिश लोकांनी माझ्या पत्नीला आणि बहिणीला शिवीगाळ केली, माझ्या लहान मुलीचे फोटो मॉर्फ केले आणि मला, माझ्या जवळच्या व्यक्तींना असंख्य द्वेषपूर्ण मेसेज पाठवले, त्यांनासुद्धा देव सद्बुद्धी देवो. मी त्याच भाषेत किंवा त्याहून वाईट प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण त्यामुळे फक्त नकारात्मकता पसरेल आणि त्यातून काहीच सिद्ध होणार नाही”, अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना सुनावलं.
आणखी वाचा – अमृता खानविलकर आई होणार का?, नवऱ्याने बेबी प्लॅनिंगबाबत दिलं उत्तर, म्हणाला, “सुरुवातीला एक काळ होता की…”
राहुलने विराटच्या भावाचाही उल्लेख केला आहे. कारण विराटच्या भावाने म्हणजेच विकासने राहुलने केलेल्या उपरोधिक पोस्टवर त्याला चांगलंच सुनावलं होतं. विराटने अनब्लॉक करताच राहुलने म्हटलं, “विकास कोहली भावा, तू जे काही मला म्हणालास, त्याचं मला वाईट वाटलं नाही. मला माहीत आहे की तू माणूस म्हणून खूप चांगला आहेत. मँचेस्टर किंवा ओवल स्टेडियमबाहेर झालेली तुझी भेट आणि माझ्या गायनाविषयी तू बोललेल्या चांगल्या गोष्टी मला आजही आठवत आहेत”, असं त्याने पुढे म्हटलं.