‘आमचं ठरलं’ म्हणत सोशल मीडियावरून प्रेमाची कबुली देत मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लगाटे ही जोडी चर्चेत आली. थेट सोशल मीडियावरून त्यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यामुळे हे जोडपं विशेष चर्चेत आलं. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून मुग्धा व प्रथमेश या दोघांनाही लोकप्रियता मिळाली. मुग्धा व प्रथमेश यांनी एकमेकांसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. (Mugdha Vaishampayan Birthday)
सोशल मीडियावरही मुग्धा व प्रथमेश बऱ्यापैकी सक्रीय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मुग्धा व प्रथमेश यांच्या डेस्टिनेशन वेडिंगचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या जोडीवर चाहते ही भरभरुन प्रेम करताना दिसतात. प्रथमेश व मुग्धा लग्नानंतर लगेचच कामाला लागले. गायन सेवा करत अनेक ठिकाणी दोघेही दौरे करतानाही दिसले. मात्र या दौऱ्यांमधून वेळात वेळ काढत ही जोडी एकमेकांसह वेळ घालवतानाही दिसते.
विशेषतः प्रथमेश हा मूळचा कोकणचा असल्याने ते बहुदा कोकणात घरी जाताना दिसले आहेत. तर मुग्धा अलिबागची असल्याने त्यांचा अलिबाग आणि कोकण येथे येणं-जाणं सुरुच असतं आणि याचे अपडेट सोशल मीडियावरुन दोघेही देत असतात. अशातच आता प्रथमेशने सोशल मीडियावरुन स्टोरी पोस्ट करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रथमेशने मुग्धाबरोबरचा सेल्फी शेअर करत त्याने बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेक्षकांच्या लाडक्या मुग्धाचा आज वाढदिवस असून नवऱ्याने दिलेल्या या खास शुभेच्छांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘कायम माझ्याजवळ असणाऱ्या अशा व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असं म्हणत त्याने मुग्धाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर मुग्धानेही ती स्टोरी रिपोस्ट करत त्याचे आभार मानले आहेत. मुग्धा व प्रथमेश ही प्रेक्षकांची आवडती जोडी असून दोघांचंही कायम सोशल मीडियावर कौतुक होताना पाहायला मिळालं आहे.