Kartiki Gaikwad Brother Haldi Ceremony : ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोने अनेकांना गायनाची मोठी संधी दिली. या शोअंतर्गत अनेक नवोदित कलाकारांना मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. आज या शोमधून बाहेर पडलेले बरेच स्पर्धक गायकाची उत्तम भूमिका निभावत आहेत. यापैकी एक नाव म्हणजे गायिका कार्तिकी गायकवाड. कार्तिकीने आजवर तिच्या गायनसेवेने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. घरातूनच गायनाचा वारसा घेतलेल्या कार्तिकीने तिच्या जादुई आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली. गायनाबरोबरचा कार्तिकी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती नेहमीच चाहत्यांना तिच्या आयुष्यातील अपडेट देत असते.
सध्या कार्तिकी तिच्या भावाच्या लगीनघाईत व्यस्त असल्याचे पाहायला मिळालं. कार्तिकीचा भाऊ कौस्तुभ गायकवाड हा देखील संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली. आता वैष्णवीने भावाच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर करत या खास सोहळ्याची झलक दाखवली आहे. भावाच्या हळदी समारंभात कार्तिकी तिच्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाली होती. “कौस्तुभ आणि काव्या यांचा हळदी समारंभ”, असं म्हणत तिने हळदीचे खास फोटो शेअर केले आहेत.
समोर आलेल्या फोटोंमध्ये भावाच्या लग्नात कार्तिकी खूपच दिसत होती. पिवळ्या रंगाचा डिझाइनर लेहेंगा तिने परिधान केला होता. यावेळी तिचा आऊटफिट मॉडर्न आणि त्याला पारंपरिक जोड असलेला होता. कार्तिकीने नववधूवराला हळद लावतानाचा फोटो शेअर केला. तर कार्तिकीचा रोनित आणि लेकाबरोबरचा फोटोही लक्षवेधी ठरला. एकूणच भावाच्या हळदीत कार्तिकीचा कुटुंबाबरोबरचा सहभाग साऱ्यांची मन जिंकून घेणारा होता. हळदीसाठी कार्तिकीच्या वहिनीने हिरव्या रंगाची काठपदरची साडी नेसली होती. तर भाऊ कौस्तुभने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाचे प्रिंटेड जॅकेट परिधान केले होते.
१ मे २०२५ रोजी कौस्तुभ व काव्याने मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीचं कार्तिकीने भावाच्या लग्नापुर्वीच्या विधींचा व्हिडीओ शेअर केला होता. लग्नाचा घाणा तसेच बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला तेव्हाही कार्तिकीने खास सहभाग घेत या कार्यक्रमात लक्ष दिले आणि गायनही केले. भावाच्या लग्न विधींमध्ये कार्तिकी स्वतः लक्ष घालताना दिसली. तसेच प्रत्येक क्षण एन्जॉय करताना दिसली.