शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॉन्सर्टवरील बंदीवरुन सुप्रसिद्ध बॉलिवूड गायकाचा सरकारला टोला, म्हणाला, “वाटेल ते करा…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 20, 2024 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Singer Diljit Dosanjh expressed his displeasure over the appointment of an advisory committee by the Maharashtra government before the concert.

कॉन्सर्टआधी महाराष्ट्र सरकारने सल्लागार समिती नेमल्याबद्दल दिलजीत दोसांझचे नाराजी

गेल्या काही दिवसांपासून गायक आणि सुपरस्टार दिलजीत दोसांझ त्याच्या ‘दिल लुमिनाटी’ या टूर शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. दिलजीत त्याच्या म्युझिकल टूरसाठी देशातल्या महत्वाच्या शहरांमध्ये फिरत आहे. यानिमित्त त्याचे भारतात अनेक ठिकाणी कॉन्सर्ट आयोजित करत आहे. काहीच दिवसांपूर्वी या म्यूझिक कॉन्सर्टसाठी दिलजीत पुण्याला येऊन गेला. त्यानंतर आता नुकताच त्याचा मुंबईत कॉन्सर्ट झाला. त्याच्या कॉन्सर्टआधी महाराष्ट्र सरकारने दिलजीतच्या शोसाठी सल्लागार समिती नेमल्यामुळे गायकाने नाराजी व्यक्त केली आहे. (Diljit Dosanjh displeasure)

१९ डिसेंबरला दिलजीत दोसांझची मुंबईमध्ये कॉन्सर्ट होती. या कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, तो त्याच्या कॉन्सर्टसाठी जारी केलेल्या ॲडव्हायझरीबद्दल बोलताना दिसत आहे. टीम दिलजीत ग्लोबल नावाच्या फॅन्स पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडीओमध्ये दिलजीत म्हणतो, “काल मी माझ्या टीमला विचारलं तर, माझ्या शोसाठी कोणतीही ॲडव्हायझरी टीम नव्हती. त्यांनी मला सर्व व्यवस्थित असल्याचं सांगितलं”.

View this post on Instagram

A post shared by TEAM DOSANJH (@teamdiljitglobal)

आणखी वाचा – “हार्दिक आणि मी लवकरच…”, अक्षया देवधरने व्यक्त केली भविष्यातील ‘ती’ इच्छा, म्हणाली, “त्याचं प्लॅनिंग…”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “आज सकाळी कळलं की, महाराष्ट्र सरकारने माझ्या विरोधात ॲडव्हायझरी टीमची नेमणूक केली होती. पण तुम्ही काळजी करू नका. माझ्या कॉन्सर्टमध्ये तुम्ही जितकी मजा मस्ती करण्यासाठी आले होते, त्याच्यापेक्षा दुप्पटीने मी तुम्हाला आनंद देईल. सकाळी मी जेव्हा योगा करत होतो, त्या दरम्यान माझ्या डोक्यात खूप चांगला विचार आला. आजच्या शोची सुरुवात मी त्याच विचाराने करणार आहे. जेव्हा सागर मंथन झालं होतं, तेव्हा अमृत होतं ते देवतांनी प्यायलं होतं. परंतु जे विष होतं ते भगवान शंकरांनी प्राशन केलं होतं”.

आणखी वाचा – “त्या शोमधून बाहेर पडले आणि…”, ‘सुख म्हणजे…’ मालिकेच्या निरोपाच्या क्षणी गिरिजा प्रभू भावुक, म्हणाली, “कोरोना काळात…”

यापुढे तो बोलला की, “ते विष आपल्या आत घेऊन कंठात ठेवलं. म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. मला यावरुन हेच शिकायला मिळालं की, आयुष्य असो किंवा आसपासचं जग तुमच्यावर कितीही विष फेकत असतील तरीही ते विष तुम्ही तुमच्या आत किती घेताय, हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी यातून हेच शिकलो. म्ही तुमच्या कामात केव्हाही कमी पडू नका. लोकं तुम्हाला अडवतील, रोखतील पण तुम्हाला जे वाटेल ते करा. माझ्या कॉन्सर्टमध्ये तुम्ही आज जेवढी मजा मस्ती करण्यासाठी आले होते, त्याच्यापेक्षा दुप्पटीने मी धम्माल मस्ती मी तुम्हाला देईल”.  

Tags: diljit dosanjhDiljit Dosanjh displeasureDiljit Dosanjh displeasure advisory committee by the Maharashtra government
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Bollywood casting meeting controversy
Entertainment

ऑडिशनला बोलावलं, चुकीचा स्पर्श केला आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “त्याने अनेक महिलांना…”

एप्रिल 17, 2026 | 10:20 am
Next Post
विवेक ऑबेरॉयने 'साथिया' चित्रपटावेळी घडलेली घटना सांगितली

"बेंचवर पेपर टाकून झोपलो, हॉटेलच्या बाथरुममध्ये कपडे बदलले अन्…", सेटवर मिळालेल्या वागणुकीवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे भाष्य, म्हणाला, "व्हॅनिटी फक्त…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.