Michael Jackson Brother Death : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दिवंगत गायक व डान्सर मायकल जॅक्सन यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिवंगत गायक व डान्सर मायकल जॅक्सनचा भाऊ आणि जॅक्सन ५ बँडचे सदस्य टिटो जॅक्सन यांचे निधन झाले आहे. टिटो जॅक्सन यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. टिटोच्या कुटुंबालाही त्याच्या मृत्यूचा धक्का बसला आहे. सर्वजण दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. (Michael Jackson Brother Death News)
टिटो जॅक्सनच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियाद्वारे समोर आली आहे. वास्तविक, टिटोच्या मृत्यूची बातमी त्यांची मुले टीजे, ताज आणि टेरिल यांनी इंटरनेटवर एका पोस्टद्वारे दिली आहे. ही पोस्ट शेअर करताना एक लांबलचक नोटही लिहिली आहे. तसेच अनेक फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “जड अंतःकरणाने आम्हाला ही माहिती शेअर करावी लागत आहे की, आमचे लाडके वडील, रॉक अँड रोल हॉल ऑफ फेमर टिटो जॅक्सन यांचे निधन झाले आहे”.
आणखी वाचा – 18 September Horoscope : मंगळवारच्या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या…
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिले आहे की, “वडीलांच्या निधनामुळे आम्ही अत्यंत दु:खी आहोत. आमचे वडील एक अद्भुत व्यक्ती होते आणि त्यांनी नेहमी इतरांच्या कल्याणाचा विचार केला. तथापि, काही लोक त्याला प्रसिद्ध जॅक्सन 5 च्या टिटो जॅक्सन म्हणून देखील ओळखतात आणि काही त्याला ‘कोच टिटो’ म्हणून ओळखतात. जरी काहीजण त्याला ‘पोप्पा टी’ म्हणून ओळखतात. प्रत्येकजण त्याला खूप मिस करेल”. टिटोच्या मुलांची ही पोस्ट खूपच भावूक आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधील नॉमिनेशन टास्कमध्ये टीम A बाद, ‘हे’ सदस्य झाले थेट नॉमिनेट, कोण जाणार घराबाहेर?
दरम्यान, टिटो जॅक्सन यांचे पूर्ण नाव टोरियानो एडरिल आहे. ते उत्तम गायक, डान्सर असण्यासोबतच गिटारही वाजवायचे. त्यांनी भावंडांप्रमाणेच गायनात यश मिळवलं आणि नाव कमावलं. ६०-७० च्या दशकात त्यांना जगभरात ओळख मिळवली. आय वॉन्ट यू बॅक, आय विल बी देअर, द लव्ह यू सेव्ह आणि एबीसी ही त्यांची सर्वात लोकप्रिय गाणी आहेत.