शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया, सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाली, “सध्या तो…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 15, 2023 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shreyas Talpade Health Update

हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया, सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाली, “सध्या तो…”

Shreyas Talpade Health Update : अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. ही बातमी समोर येताच प्रेक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण असलेलं पाहायला मिळत आहे. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर आलं. ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटांच चित्रीकरण संपवून तो घरी आल्यानंतर ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. घरी आल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं त्यांनतर तात्काळ अभिनेत्याला रुग्णालयात नेण्यात आलं.

रुग्णालयातील तपासणीदरम्यान अभिनेत्याच्या हृदयामध्ये ब्लॉक असल्याचं आढळलं. त्यानंतर लगेचच अँजिओप्लास्टी करण्यात आली. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच ही अँजिओप्लास्टी केल्याने मोठा धोका टळल्याचं ही समोर आलं. सध्या अभिनेत्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तसेच त्याच्या प्रकृतीतही सुधारणा होत असल्याचं समोर आलं.

आणखी वाचा – श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी नेमकं काय घडलं?, घरी येऊन लगेचच पत्नीला सांगितली ती गोष्ट अन्…

श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ चित्रपटाचं चित्रीकरण होता. गुरुवारी त्याने संपूर्ण दिवसभर चित्रपटाचं शूटिंग केलं. शूटिंगदरम्यान सेटवर मात्र त्याला कोणताच त्रास झाला नाही. शूटिंग संपवून घरी परतल्यानंतर अभिनेत्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने लगेचच त्याच्या पत्नीला याबाबत सांगितले. त्यानंतर अभिनेत्याच्या पत्नीने लगेचचं श्रेयसला रुग्णायालयत नेलं. रुग्णालयात नेतानाही श्रेयसला चक्कर आली. तात्काळ उपचार केल्याने त्याची प्रकृती ठीक असल्याचं समोर आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepti Shreyas Talpade (@deeptitalpade)

आणखी वाचा – श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?

श्रेयसच्या प्रकृतीबाबत त्याची पत्नी दीप्ती तळपदे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती शेअर केली आहे. दीप्ती म्हणाली, “माझ्या पतीची तब्येत बिघडल्यानंतर तुम्ही दाखवलेली काळजी, प्रेम आणि प्रार्थना याबाबत मी तुमची आभारी आहे. आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की, आता त्याची तब्येत स्थिर आहे. काही दिवसांमध्येच त्याला रुग्णालयामधून घरी आणण्यात येईल. या संपूर्ण काळामध्ये वैद्यकिय यंत्रणांनी दिलेला प्रतिसाद तसेच त्यांची घेतलेली काळजी महत्त्वपूर्ण ठरली. तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हा दोघांना संकटाशी सामना करायचं बळ मिळत आहे” असं म्हणत तिने चाहत्यांचे आभार मानले.

Tags: shreyas talpadeshreyas talpade health updateshreyas talpade wifeshreyas talpade wife reaction
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
marathi actress sukanya mone and resham tipnis expressed concern about shreyas talpade's health

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कलाकारही हादरले, देवाकडे प्रार्थना, सुकन्या मोने म्हणाल्या, “स्वामी समर्थ…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.