बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करच्या पतीने दाखवले घरातील वातावरण, एका महिन्यापासून सुरु होता कठीण काळ, व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 17, 2025 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
dipika kakar health

शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करच्या पतीने दाखवले घरातील वातावरण, एका महिन्यापासून सुरु होता कठीण काळ, व्हिडीओ समोर

dipika kakar health : दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. बर्‍याचदा ते त्यांच्या रोजच्या आयुष्याची झलक त्यांच्या युट्युब चॅनेलवर शेअर देखील करतात. दीपिका आणि शोएब यांचे आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवणे, आपल्या मुलाबरोबर मजा करणे आणि इतर क्षण पाहणे हे त्यांच्या चाहत्यांना आवडते. मात्र काही दिवसांपासून दीपिका चर्चेत आलेली पाहायला मिळाली. दीपिका तिच्या तब्येतीमुळे चर्चेत होती. दीपिकाला ट्यूमर आणि स्टेज २ यकृत कर्करोगाबद्दल माहिती मिळाली आणि तिचा कठीण काळ सुरु झाला. अलीकडेच, अभिनेत्री शस्त्रक्रियेनंतर घरी परतली असून तिने आपल्या मुलाबरोबर फादर्स डे साजरा करण्यासाठी थोडा वेळ घेतला असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

शोएब इब्राहिमने अलीकडेच त्याच्या युट्युब हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने दीपिका कक्करचा रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतरची झलक दर्शविली आहे. सुरुवातीला, शोएब आपला मुलगा रुहान आणि पुतण्या हैदरसाठी खेळणी खरेदी करतो. त्या गोष्टी घरी आणल्यानंतर ती खेळणी उघडून ते या खेळणींबरोबर खेळू लागतात. त्यावेळेला दीपिकाही त्यांच्याबरोबर खेळू लागते. दुसर्‍याच दिवशी, फादर्स डेच्या दिवशी दीपिका एका काठीवर शोएबसाठी एक विशेष इच्छा लिहिते आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाला तिच्या वडिलांना देण्यास सांगते.

आणखी वाचा – मन्नारा चोप्राच्या वडिलांचे निधन, वयाच्या ७२व्या वर्षी प्रियांका चोप्राच्या काकांनी घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

View this post on Instagram

A post shared by Dipika Kakkar Ibrahim ✨♥️ (@dipika_kakar_ibrahim)

व्हिडीओच्या शेवटी, अभिनेत्याने शेअर केले की, जेव्हा तो व्हिडीओ एडिट करत होता, तेव्हा तो आपल्या मुलाबरोबर खेळण्यापासून स्वत: ला रोखू शकला नाही. त्याने चाहत्यांचे आणि अल्लाहचे आभार मानले आहेत. शोएबने सांगितले की, घरातील काही काळ हा दडपणाखाली होता कारण दीपिका कक्करच्या उपचारानंतर प्रत्येकाला धक्का बसला होता. त्यांनी चाहत्यांना असेही सांगितले की त्याच्या पत्नीचे उपचार अद्याप संपलेले नाहीत आणि डॉक्टरांच्या सूचनांच्या आधारे ते आणखी एक वर्ष चालणार आहेत.

आणखी वाचा – “मृत्यू डोळ्यांदेखत पाहिला”, इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्या योगेशने सांगितलं नक्की काय काय घडलं?, म्हणाला, “कोणी ऐकलं नाही आणि..”

शोएब म्हणाला, “अल्लाह तुझे आभारी आहे, कारण १ महिन्यापासून हा कठीण काळ सुरु होता, आज कित्येक दिवसांनी घरात आनंद आहे आणि अशा निरागस हसण्यामुळे घरातील वातावरण हलके झाले आहे. जर देव आपल्या पाठीशी असेल तर घरात सर्व काही ठीक होईल आणि आम्ही हसणारे वातावरण कायम राहील याचा प्रयत्न करु”.

Tags: bollywood newsDipika Kakar Healthentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Karisma Kapoor Ex Husband

अभिषेकनंतर तिने माझा वापर केला", करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केलेले गंभीर आरोप, म्हणालेला, "मुलांना भेटायलाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.