शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 4, 2025 | 4:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dipika Kakar Health

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, "आता आयसीयूमध्ये…"

Dipika Kakar Health : दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम सध्या कठीण प्रसंगाला सामोरं जात आहेत. दीपिकाला यकृताचा कर्करोग झाला असल्याचे समोर आले. आणि म्हणूनच यावर शस्त्रक्रिया करायची म्हणून दीपिकाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. बरेच दिवसांपासून दीपिकाची तब्येत ठीक नसल्याचे समोर आले. तिच्या यकृतामधील टेनिस बॉल इतका ट्यूमर असल्याची माहिती पती शोएब इब्राहिमने दिली. यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये दीपिकाला यकृताचा कर्करोग असल्याचे समोर आले. आणि आता दीपिकाची शस्त्रस्क्रियाही पूर्ण झाली असल्याचं तिच्या पतीने पोस्ट शेअर करत सांगितलं. शस्त्रक्रियेनंतर दीपिका सध्या आयसीयूमध्ये असून तिची तब्येत स्थिर असल्याचं शोएबने सांगितलं.

दीपिकाला पोटात ट्युमर असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं. यानंतर शोएबसह संपूर्ण कुटुंबियांना मोठा धक्का बसला. फदीपिकाचा नवरा शोएब इब्राहिमने एक व्हिडीओ बनवत चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे आणि दीपिकासाठी प्रार्थना केली आहे. शोएबने सांगितले की, दीपिकाला यावर उपचार म्हणून शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नाही. आणि याप्रमाणे दीपिकाची शस्त्रक्रिया देवाच्या कृपेने पूर्ण झाली आहे. याबाबतची अपडेट त्याने इंस्टाग्रामवर दिली आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगाने झालेली अशी अवस्था, आर्थिक मदतीसाठी केलेलं आवाहन, शेवटच्या व्हिडीओत ओळखणंही झालेलं कठीण

दीपिकाच्या नवऱ्याने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “सर्वांना नमस्कार, माफ करा, काल रात्री मी तुम्हाला अपडेट देऊ शकलो नाही, ही एक मोठी शस्त्रक्रिया होती. ती १४ तास ओटीमध्ये होती. पण देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झाले. दीपी सध्या आयसीयूमध्ये आहे. तिला थोडा त्रास होत आहे, पण ती स्थिर आहे आणि ती ठीक आहे. तुमच्या प्रेमासाठी, प्रार्थनांसाठी आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे मनापासून आभार. याचा खरोखर खूप अर्थ आहे. ती आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला सर्वांना अपडेट करेन. पुन्हा एकदा धन्यवाद. तिच्यासाठी प्रार्थना करत राहा”.

आणखी वाचा – Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

सर्जरीपूर्वी शोएबने व्हिडीओ शेअर करत दीपिकाबाबत काळजी व्यक्त केली होती. यावेळी तो खूप टेन्शनमध्ये असल्याचं दिसलं. तो म्हणाला होता की, “डॉक्टरांनी ज्या तपासण्या करण्यास सांगितल्या होत्या त्या झाल्या आहेत. आता आम्हाला कळेल की, नक्की काय उपचार करायचे आहेत. पोटातील ट्युमर काढणं गरजेचं आहे. हे मी आधीही सांगितलं होतं. इतर राहिलेल्या तपासण्या झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात सर्जरी होईल. तुम्ही सगळ्यांनी दीपिकासाठी प्रार्थना करा”. अचानक प्रसंग ओढावल्यानंतर दीपिकासह शोएबही पूर्णपणे खचला आहे.

Tags: dipika kakar cancerDipika Kakar Healthentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Nivedita saraf talk about ashok saraf

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता...”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.