महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून विनोदी अभिनेत्री शिवाली परब हिने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. शिवाली आपल्याला “पोस्ट ऑफिस उघडं आहे” या मालिकेत सुद्धा दिसली होती. या मालिकेत देखील शिवलीने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.
“पोस्ट ऑफिस उघडं आहे” या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून शिवाली नेहमीप्रमाणे हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताच आहे. या व्यतिरिक्त शिवाली तिच्या सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. शिवाली तिचे वेगवेगळ्या अंदाजातले फोटोज तसेच व्हिडीओ शेअर करत असते. शिवलीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर ब्लेजर आणि पॅन्ट मधले काही फोटोज शेअर केले आहेत. (Shivali Look Like Amol Palekar)
हे देखील वाचा: ‘तुझ्यात खूप बदल झालाय’ सोनालीचा फोटो चर्चेत…
या फोटोंमध्ये शिवालीने ब्लेजर सोबत संपूर्ण लुक तयार केला आहे. या लूकमध्ये शिवलीने शॉर्ट हेअर चा वीक घातला आहे. शिवलीने या फोटोंच्या कॅप्शन मध्ये Be yourself, there’s no one better असे कॅप्शन दिले आहे. शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर एकाने या फोटोंवर तिला चक्क “अमोल पालेकर प्रो मॅक्स” अशी कमेंट केली आहे. याचबरोबर एकाने तिला अमिताभ बच्चन असं देखील म्हटलंय.

शिवाली आपल्याला नेहमीच विविध प्रकारचे स्किट करत असते. हास्यजत्रेतील तिचे मोना डार्लिंग हे कॅरेक्टर असो किंवा “शिवाली आवली कोवली” तिचे हे दोन्ही स्किट खूप प्रसिद्ध आहेत. शिवाली योग्य टाईमवर मारलेल्या पंचमुळे ती ओळखली जाते. (Shivali Look Like Amol Palekar)
हे देखील वाचा: समुद्र आणि समृद्धीचा मोहक अंदाज
शिवाली मूळची कल्याण ची राहणारी असल्यामुळे तिला कल्याणची चुलबुली शिवाली म्हणून सुद्धा ओळखतात. शिवालीच नुकताच “मॅड केलंय तू” नावाच्या गाण्याचा अल्बम देखील आलाय. मध्यतंरी शिवलीने तिचा सहकलाकार निमिष कुलकर्णी सोबत चा शेअर केलेला एक फोटो खूप चर्चेत आला होता. निमिष आणि शिवालीने अनेक स्किट सोबत केले आहेत. तर निमिष हास्यजत्रेत अजून देखील काम करत असून तो स्टार प्रवाह वरील “सहकुटुंब सहपरिवार” या मालिकेत देखील काम करत आहे. शिवालीचे निमिष सोबतच तिच्या इतर सहकलाकारांसोबत सुद्धा खूप छान बॉण्ड आहे.