रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “आज आई-वडील असते तर…”, पुरस्कार स्वीकारताना ‘शिवा’ला अश्रू अनावर, तिला पाहून उपस्थितही रडले अन्…

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 23, 2024 | 2:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva serial fame actress Purva Kaushik gets emotional while accepting the Zee Marathi Awards 2024 award video viral on social media

झी मराठी अवॉर्डस २०२४ पुरस्कार स्वीकारताना शिवा मालिका फेम अभिनेत्री पूर्वा कौशिक भावुक, व्हिडिओ व्हायरल

Zee Marathi Awards 2024 Awards : आपण केलेला अभिनय प्रेक्षकांना आवडतो की नाही याची पोचपावती कलाकारांना सोशल मीडियावरून मिळतच असते. मात्र तरीही ती एका प्रतीकाच्या रूपात त्या चॅनलवरील अवॉर्ड्स मार्फत मिळते. त्यामुळे मालिकांमध्ये काम करणारे सर्वच कलाकार पारितोषिक सोहळ्यांसाठी फारच उत्सुक असतात. यापैकी एक महत्त्वाचा पूरस्कार सोहळा म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘झी पुरस्कार’. हा सोहळा म्हणजे डोळ्यांची पारणं फेडणारा सोहळा आहे. मालिकेतील कलाकारांचे दर्जेदार सादरीकरण व या सोहळ्याला येणारी विविध क्षेत्रातील पाहुण्यांची उपस्थिती यामुळे हा सोहळा अधिक रंगारंग ठरतो. अशातच नुकताच यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. (Purva Kaushik Emotional)

मराठी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील कलाकार ‘झी मराठी’च्या २५ वर्षाचा अद्भुत प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. कलाकारांच्या आगमनाबरोबरच रेड कार्पेट हा कलाकारांच्या वेगवेगळ्या लुकने भरलेला होता. यावेळी कलाकारांनी रेड कार्पेटवर पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखांपासून आताच्या आधुनिक फॅशनपर्यंत हजेरी लावली होती. या सोहळ्यात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या भव्य सोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आले आहेत आणि यापैकी एका प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – विमानतळावर ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्री व कुशल बद्रिकेची भेट, तोंडभरुन कौतुक करत म्हणाली, “तुझा अभिमान…”

झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यात पूर्वा कौशिक, राकेश बापट व नितीन चव्हाण हे भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पुर्वाला तिच्या आई-वडिलांबरोबरचा फोटो भेट म्हणून देण्यात आला असून हा फोटो पाहून पूर्वा भावुक झाली. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “मी आणि आई-बाबा जेव्हा हा सोहळा घरी बसून बघायचो. तेव्हा माझे आई-बाबा होते. त्यांची खूप इच्छा होती की, मला हा पुरस्कार मिळावा. पण आज ते जेव्हा मिळालं तेव्हा ते नाहीत. आज आई-बाबा असते तर त्यांना खूप छान वाटलं असतं”.

आणखी वाचा – सूरज चव्हाणला घर बांधून देण्यावरुन हिणवणाऱ्यांना अंकिता वालावलकरचं उत्तर, म्हणाली, “बाहेर आल्यानंतर कळालं की…”

दरम्यान, हा प्रोमो पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात अश्रु तरळले असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच या प्रोमोखालीही नेटकऱ्यांनी तशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “अभिनंदन पूर्वा”, “यासाठी तू नक्कीच पात्र आहेस”, तुझे खूप कौतुक”, “आम्ही तुमचा प्रवास पाहिला आहे अशीच कायम पुढे जा” अशा अनेक कमेंट्स करत पूर्वाच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.      

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Sydney Sweeney To Launch Soap 
Lifestyle

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

मे 31, 2025 | 2:00 pm
Next Post
Tamil Actor Bala third wedding

सुप्रसिद्ध अभिनेत्याने तिसऱ्यांदा थाटला संसार, थाटामाटात केलं तिसरं लग्न, मामाच्या मुलीशीच जुळले सुर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.