Shilpa Shetty Fitness Secret : बॉलिवूडच्या अभिनेत्री म्हटलं की फिटनेस हा आलाच. या फिटनेसच्या बाबतीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे शिल्पा शेट्टी. वयाची ५० वर्ष उलटली तरी आजही तिच्या चेहऱ्यावरचे तेज काही कमी झालेले नाही. सोशल मीडियावरही शिल्पा शेट्टी नेहमीच डाएट, फिटनेस, व्यायाम आणि योगचे अनेक व्हिडीओ शेअर करते. आणि शिल्पाच्या या फिटनेसच्या टिप्स तिचे चाहतेही फॉलो करताना दिसतात. फक्त व्यायाम नाहीतर आरोग्यदायी पेय आणि खाद्यपदार्थ खात ती तिच्या फिटनेसकडे लक्ष देते. अभिनेत्रीचा नेमका फिटनेस फंडा काय याबाबत तिने बरेचदा अनेक मुलाखतींद्वारे सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात…
अभिनेत्री म्हणालेली, “मी माझ्या दिवसाची सुरुवात दीड ग्लास कोमट पाण्याने करते. त्यानंतर मी चार थेंब नोनी ज्यूस’ पिते, जे एनर्जी बूस्टर म्हणून काम करते. शेवटी मी एक चमचा खोबरेल तेलाने गुळण्या करते. ही ऑयल पुलिंगची आयुर्वेदिक पद्धत आहे”. शिल्पासाठी नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. अभिनेत्री म्हणालेली, “मी जास्त ब्रेड खात नाही म्हणून मला ताज्या फळांमधून फायबरचा डोस मिळतो. बदामाचे दूध काही प्रमाणात मुसली आणि सफरचंद किवा आंब्याचे काही तुकडे मिसळून सेवन करणे हा माझा आवडता नाश्ता आहे. मला नाश्त्यात अंडीदेखील आवडतात”.
अभिनेत्रीने अनेकदा खुलासा केला होता की, बरेच लोक त्यांचे वजन मेंटेन करण्यासाठी संघर्ष करतात. ती म्हणाली होती, “तूप माझ्या जेवणाचा एक मुख्य भाग आहे. केळीसारखी उच्च कार्बयुक्त फळेदेखील तुमच्यासाठी खूप चांगली आहेत. ती सहज उपलब्ध आहेत. परंतु, बहुतेक लोक त्यांच्यापासून दूर राहतात. त्यांना भीती वाटते की, त्यामुळे चरबी वाढेल. तुमच्या डाएटमध्ये ब्राउन राइस समाविष्ट करा. तुम्ही तुमच्या आहारात असे अन्नपदार्थ समाविष्ट केले पाहिजेत, जे तुमचे पोट भरलेले ठेवतात आणि तुमचे वजन नियंत्रित करतात आणि तुम्हाला नैसर्गिक चमक देतात”.
आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर, तितीक्षा आणि सुरुची…; मराठी अभिनेत्रींनी एकत्र येत सुरु केला नवा व्यवसाय, ब्रँडचं नाव आहे…
शिल्पाला कामाच्या वेळेइतकेच जेवणाच्या वेळेलाही महत्त्व देते. “जरी मला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे असले तरी मी संध्याकाळी ७:३० च्या आधी जेवण करते”, असे अभिनेत्री म्हणाली होती. ही सवय तिला तिच्या दैनंदिन दिनचर्येचे पालन करण्यास आणि संध्याकाळचा आनंद घेण्यास मदत करते.





